बांधकाम साहित्यांच्या दरांचा तपशील
बॉक्स -
बांधकाम साहित्य लॉकडाऊन आधीचे दर नंतरचे दर
वाळू आठ ते साडेआठ हजार रूपये प्रति ब्रास दहा हजार रूपये प्रति ब्रास
विटा आठ ते नऊ रूपये प्रति नग सव्वा आठ ते सव्वा नऊ रूपये प्रति नग
स्टील ४० हजार रूपये प्रति टन ५० हजार रूपये प्रति टन
सिमेंट २६० ते २७० रूपये प्रति गोणी ३०० ते ३२० रूपये प्रति गोणी
--
लॉकडाऊनपूर्वी स्टीलचा दर हा ४० हजार रूपये प्रति टन होता़ तो लॉकडाऊनच्या काळात व आत्ता निर्यात वाढल्याने ५० हजारांवर गेला आहे़ मात्र फेब्रुवारी मार्चपर्यंत पुन्हा हे दर ४० हजारांपर्यंत येतील अशी आशा आहे.
-प्रदीप पांचाळ, स्टील विक्रेता
--
निर्मिती शुल्क वाढल्याने लॉकडाऊनच्या काळात सिमेंटचे भाव शंभर रूपयांनी वाढले गेले़ पण आजमितीला सिमेंटचे दर पुन्हा कमी होताना दिसत आहे. लवकरच ते २७० रूपये प्रति गोणी येतील असे चित्र आहे़
-चिराग बिर्ला, सिमेंट व्यापारी