वडापुरी : सध्या उन्हाळा खूपच जाचू लागला आहे. त्यामुळे पाण्याची आत्तापासूनच टंचाई भासू लागली आहे. पुढील दोन-तीन महिने कसे जातील, याचीच सर्वत्र चर्चा आहे. परंतु वडापुरी येथील सुरेश जाधव यांना असल्या कडक दुष्काळामध्ये पाडव्याच्या मुहूर्तावर बोअरला दीड इंच पाणी लागले. त्यांनी बोअरला लागलेले पाणी स्वत:च्या टँकरमध्ये आणून गावाला पाणीपुरवठा करण्याचा निर्धार केला आहे. गुढीपाडव्याच्या सणाचे औचित्य साधून त्यांनी गावातील मंदिर परिसर स्वच्छ केला. त्यामुळे गावात जाधव कुटुंबाचे कौतुक होत आहे. सध्या वडापुरी परिसरात उन्हाळ्याची तीव्रता खूपच वाढली आहे. त्यामुळे विहिरीचे व बोअरचे पाणी कमी होत चालले आहे. असे असले तरी जाधव यांना बोअरला चांगले पाणी लागले असल्याने येत्या दोन-तीन महिन्यांत आम्हाला पिण्याच्या पाण्याची अडचण भासणार नाही. तसेच आम्ही बोअरचे पाणी या परिसरातील नागरिकांना देणार असल्याचे जाधव कुटुंबीयांनी सांगितले.या वेळी जाधव कुटुंबीयांनी गावातील मंदिराचा परिसर स्वच्छ करण्यास मदत केली. आज पाडवा असल्याने मंदिरामध्ये विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले.
विंधनविहिरीचे पाणी गावाला देण्याचा निर्धार
By admin | Published: March 31, 2017 2:27 AM