कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्य सरकारने पहिली ते दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. परंतु, हे शैक्षणिक वर्ष संपले. याची मात्र अद्यापही अधिकृत घोषणा केली नाही. त्यामुळे राज्यातील शिक्षण क्षेत्रामध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. ऑनलाईन शिक्षणाला विद्यार्थी, शिक्षक व पालक हे तिघेही कंटाळलेले आहेत. दर वर्षी मार्चमध्ये शिक्षण विभागाकडून पुढील वर्षाच्या कामाच्या नियोजनाचे परिपत्रक काढले जाते. त्यानुसारच राज्यभरात वर्षभराचे शैक्षणिक उपक्रम ,परीक्षा व सुट्ट्या यांचे नियोजन केले जाते. मात्र अद्यापही असे कोणतेही सूतोवाच केले नाही. त्यामुळे लवकरात लवकर शैक्षणिक वर्ष समाप्तीची घोषणा करून शाळांना सुट्टी जाहीर करण्याबाबतचे परिपत्रक काढून पुढील शैक्षणिक वर्षाच्या नियोजनाचा आराखडा जाहीर करावा.
नवीन शैक्षणिक वर्षाचा नियोजन आराखडा निश्चित करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 4:07 AM