पुणे : मराठा समाजाला आरक्षणापासून वंचित ठेवणाºया सरकारला धडा शिकविण्यासाठी स्वत: मराठा समाजाने एकत्रित येत राष्ट्रीय मराठा पार्टीची स्थापना केलेली आहे. तरी शहर व जिल्ह्यातील तरुण कार्यकर्त्यांना आमच्या सोबत घेऊन येणाºया लोकसभा व विधानसभा निवडणुकीत सर्वच पक्षांना धडा शिकवणार असल्याची माहिती राष्ट्रीय मराठा पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अंकुश पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.या वेळी राष्ट्रीय मराठा पार्टीचे कार्याध्यक्ष विकास देशमुख, उपाध्यक्ष मनीषा सोनी, राष्ट्रीय सचिव अनिकेत जाधव, सहसचिव बालाजी गोडसे, महासंघ विजय कोयले आदी उपस्थित होते. या वेळी पाटील म्हणाले, कोपर्डी हत्याकांडातील आरोपींना फाशी द्या, आदी मागण्यासाठी राष्ट्रीय मराठा पार्टी नवीन पक्ष काढला आहे.
सर्व पक्षांना धडा शिकवण्याचा निर्धार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 01, 2017 4:12 AM