कडूस : खेड तालुक्यातील प्रतिपंढरी समजल्या जाणाऱ्या कडूस भागाचा विकास गेल्या पाच वर्षांत झाला नाही. मात्र, आत सर्व विकासकामे करण्यासाठी निधी उपलब्ध देणार असून कडूसचा कायापालट करणार असल्याचे प्रतिपादन आमदार दिलीप मोहिते-पाटील यांनी केले.
कडूस विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी, कडूस या संस्थेच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त तसेच कडूस ग्रामपंचायतीच्या माध्यमातून विकासकामांच्या उद्घाटन प्रसंगी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे, दौंडचे माजी आमदार तथा जिल्हा बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात, कैलास सांडभोर, बाजार समितीचे सभापती विनायक घुमटकर, अरुण चांभारे, अशोक शेंडे, किसन नेहेरे, सुरेश शिंदे, प्रताप ढमाले, चेअरमन पंडित मोढवे, व्हाईस चेअरमन चंद्रकांत पारधी, सरपंच निवृत्ती नेहेरे, उपसरपंच कैलास मुसळे, राजेंद्र वाळुंज, रमेश राळे, मिलिंद टोणपे, निबंधक सुभाष भोकाटे, हरिश्चंद्र कांबळे, अभिजित शेंडे, तात्यासाहेब धायबर, माऊली ढमाले, मारुती जाधव, बाळासाहेब बोंबले, सचिव दादासाहेब कल्हाटकर, ग्रामविकास अधिकारी बी. बी. माने, रवींद्र गायकवाड, ज्ञानेश्वर तुपे, गजानन धायबर, शामराव ढमाले, बंडू नेहेरे उपस्थित होते.
प्रास्ताविकात चेअरमन पंडित मोढवे यांनी शेतकऱ्यांच्या हिताची जपणूक करताना संस्थेचा सहकार क्षेत्रात झालेला लौकिक सांगून आजपर्यंतचा लेखाजोखा सादर केला. सूत्रसंचलन कैलास मुसळे यांनी केले तर आभार अभिजित शेंडे यांनी मानले.