कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून एकदिवसही सुट्टी न देता कामगारांना काम करण्यास सांगितले. कोरोनामुळे सर्व काही बंद असल्याने मिळत असलेल्या पगार कपात करावी लागेल असे संस्थानने सांगितले. परिस्थितीच तशी असल्याने ते कोणत्याही अटी, शर्तीविना मान्य करण्यात आले. कामगारांना पागर वाढ न देता वरिष्ठ मंडळींचा पगार वाढवला जात असल्याचा आरोप कामगारांनी केला.
त्यामुळे संस्थानने आता मागील दीड वर्षाची थकबाकी द्यावी. तसेच पगार मूळ स्वरूपात द्यावा, अशी मागणी संस्थान कामगारांचे प्रतिनिधी राजाराम निम्हण, दत्तात्रय जगताप, दिलीप डांगे, श्रीरंग धरपाळे, संतोष कुंभार, गणेश राऊत यांनी केली आहे.
चौकट
सर्व मंदिरे बंद, उत्पन्नात मोठी घट
“कोरोनामुळे दोन वर्षांपासून देवदेवश्वर संस्थानची सर्व मंदिरे बंद आहेत. संस्थानचे उत्पन्न घटले आहे. तरीही सेवकांना एकूण वेतनाच्या पंचाहत्तर टक्के वेतन देत आलो आहोत. त्यासाठी वेळप्रसंगी संस्थानच्या ठेवींवर आवश्यक निधी उभा करावा लागला. याबाबत सर्व सेवकांना व त्यांच्या प्रतिनिधींना विश्वासात घेऊनच सर्व निर्णय घेतले गेले. परिस्थिती सुधारली, मंदिरे पूर्ववत सुरू झाली की सर्व सेवकांना त्यांचे नेहमीचे वेतन पूर्णपणे देण्यात येईल. संस्थानने सेवकांच्या नेहमीच्या वार्षिक वेतनवाढीवरही निर्बंध घातलेले नाहीत. सर्व सेवक संस्थानच्या अडचणी समजून घेऊन सर्वोतोपरी सहकार्य करत आहेत. मात्र काही मोजके सेवक वैयक्तिक हितसंबंधापोटी इतर सेवकांची हेतुपुरस्सर दिशाभूल करत आहेत.”
- सुधीर पंडित, प्रमुख विश्वस्त, देवदेवेश्वर संस्थान.