पुणे : मंदिराचा खर्च किती असावा याचा विचार न्यासाने केलेला नाही. तर स्वतःचा असा अंदाज आहे की मंदिराच्या आतील बाजूला सुमारे ३०० ते ४०० कोटींचा खर्च लागू शकतो. तर मंदिराच्या बाहेरच्या (प्रकोटाचा) विकासासाठी एकूण खर्च अंदाजे अकराशे कोटी रुपये लागू शकतो. या प्रकोटाचा विकास करण्यासाठी एका बड्या कुटुंबाने विचारणा केली होती. मात्र नाव लागणार नाही असे सांगून तो प्रश्न तिथेच मिटवला. तर देशातील सामान्य व्यक्तीला देखील मंदिरासाठी दान करता यावे त्यांच्या दानातून मंदिर उभारले जावे. सामान्य व्यक्तीच्या राम भक्तीला समाधान देणारा या अभियानाचा मूळ हेतू आहे, असे श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र कोषाध्यक्ष स्वामी गोविंद देव गिरी महाराज यांनी सांगितले.
राम जन्मभूमी मंदिर निर्माण व निधी संकलन अभियान याविषयी माहिती देण्यासाठी निधी निर्माण पश्चिम समितीच्या वतीने गुरुवारी (दि. ३१ डिसेंबर) आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी परिषदेचे मुंबई क्षेत्र मंत्री शंकर गायकर , रा.स्व . संघ प्रांत कार्यवाह डॉ . प्रवीण दबडघाव , प्रांत अभियान प्रमुख संजय मुदराळे , प्रांत अभियान सहप्रमुख मिलींद देशपांडे , पूणे महानगर अभियान सहप्रमुख महेश पोहनेरकर यावेळी उपस्थित होते. गिरी महाराज म्हणाले की, या कार्यासाठी अर्थसंकलन करण्यासाठी मकर संक्रांती पासून माघ पौर्णिमेपर्यंत (दि. १५ जानेवारी ते २७ फेब्रुवारी) निधी संकलनाचे केले जाणार आहे. यासाठी एक हजार, शंभर, दहा रुपयांचे कुपन छापण्यात आलेली आहेत. एकूण ५०० कोटींची ही कुपन छापलेली आहेत. या कुपनच्या माध्यमातून पश्चिम महाराष्ट्रातील ७ जिल्ह्यातील १० हजार गावातील ५० लाख कुटुंबांपर्यत पोहचण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यासाठी दोन हजार संत आणि ५० हजारांहुन अधिक स्वयंसेवक कार्य करणार आहेत.
या कार्यासाठी केंद्र सरकार निधी देणार नसून सर्वसामान्य नागरिकांकडून हा निधी गोळा केला जाणार आहे. परदेशी निधी घेण्याची सध्या नाही. मात्र परवानगी मिळताच परकीय देशातील भक्तांचा निधी स्वीकारला जाईल. या अभियानातून अंदाजे हजार ते अकराशे कोटी रुपयांचा निधी जमा होण्याचा अंदाज त्यांनी वर्तविला. .........................राम मंदिर संपूर्ण विश्वाची सांस्कृतिक राजधानी व्हावी, हा हेतू आहे. तसेच मुख्य कार्य म्हणजे राम मंदिर निर्माण झाल्यानंतर हे पूजे अर्जेचे मंदिर न राहता सांस्कृतिक तसेच चेतना जाणणारे केंद्र निर्माणाचा प्रयत्न असणार आहे. श्रीराम हे एका देशाचे, धर्माचे नसून तर अखिल विश्वाचे आहेत. मंदिराचा जागेवर २००० फुटापर्यत वाळू , रेती असल्याने ते मंदिर १ हजार वर्षापर्यत टिकावे यासाठी आयआयटीची तज्ज्ञांच्या समिती नेमण्यात आली आहे. असे गिरी महाराज म्हणाले.