शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐन दिवाळीत नेते बंडोबांना थंडोबा करण्याच्या मोहिमेवर; महायुती, महाआघाडीसाठी पुढील ४ दिवस वाटाघाटीचे
2
आजचे राशीभविष्य : शुक्रवार 1 नोव्हेंबर 2024; आज अवैध कामांपासून दूर राहावे, क्रोध आणि वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
दिवाळी झटका! LPG सिलिंडरचा भाव वाढला, पटापट चेक करा दिल्ली ते मुंबईपर्यंतचे नवे दर
4
२४ तासांत १०० विमानांना बॉम्बची धमकी, एअर इंडियाच्या ३६, विस्ताराच्या ३५ फेऱ्यांवर परिणाम  
5
नेपाळी नोटेवरील नकाशात दाखवली तीन भारतीय क्षेत्रे, नोटा छापण्याचे कंत्राट दिले चिनी कंपनीला
6
मनोज जरांगेंचे ‘एमएमडी’ समीकरण; विधानसभा लढवण्याची घोषणा
7
मुंबईकरांना भुरळ लाइटवेट दागिन्यांची! धनत्रयोदशीला बाजारात २५० कोटींची उलाढाल
8
निवडणुकीतील गैरप्रकार थांबवा, अन्यथा कारवाई, मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांचा इशारा
9
राज्यातील बेरोजगारीवर न बोलणारे हे कसले सरकार? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा सवाल
10
पाकिस्तानसह जगभर दिवाळीची धूम, अमेरिकेत शाळांना सुट्टी
11
राज्यात आलेली सर्वाधिक परकीय गुंतवणूक फडणवीसांच्या नावावर
12
आयपीएल रिटेंशन : रोहित शर्मा मुंबईकडेच; माही केवळ ४ कोटींमध्ये खेळणार
13
समतोल ‘मन’ हेही ‘धन’; आज त्याची पूजा करू या!
14
मध्य रेल्वेने प्रवाशांना धरले वेठीस; ४ दिवस सुटीचे वेळापत्रक लागू
15
19 मिनिटांत 22 किलोमीटरचे अंतर पार अन् मिळाले जीवदान
16
खंडणीसाठी धमकावल्याप्रकरणी छोटा राजन टोळीचे ५ जण अटकेत
17
इस्रायली महिला फायटर्सचे इराणवर हल्ले!
18
११ वर्षीय पीडितेच्या गर्भपातास परवानगी; रक्त नमुना, टिश्यू जतन करण्याचे निर्देश 
19
‘राज’ की बात, भाजप अन् शिंदेंची अडचण!
20
दिवाळी, छटपूजेनिमित्त मध्य रेल्वेच्या ५८३ गाड्या

विकसनशील बारामतीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 4:15 AM

पाच वर्षांत चौघांची बदली : प्रतीक्षा ५ व्या मुख्याधिकाऱ्यांची प्रशांत ननवरे बारामती : राज्यातील सर्वाधिक बजेट असणाऱ्या बारामतीचा वायुवेगाने ...

पाच वर्षांत चौघांची बदली : प्रतीक्षा ५ व्या मुख्याधिकाऱ्यांची

प्रशांत ननवरे

बारामती : राज्यातील सर्वाधिक बजेट असणाऱ्या बारामतीचा वायुवेगाने होणारा विकास बारामतीकरांसाठी भूषणावह असाच आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शहराचा चेहरामोहरा बदलणारे प्रकल्प हाती घेतले आहेत. मात्र, याच विकसनशील बारामतीला मुख्याधिकाऱ्यांच्या अस्थिरतेचे ग्रहण लागले आहे. पाच वर्षांत चार मुख्याधिकारी बदलून गेले आहेत. शहराला आता पाचव्या मुख्याधिकाऱ्यांची बारामतीला प्रतीक्षा आहे.

गेल्या ५ वर्षांत ७ आॅगस्ट २०१५ पासून नीलेश देशमुख, मंगेश चितळे, योगेश कडुसकर, किरणराज यादव हे ४ मुख्याधिकारी बदलून गेले आहेत. आता ५ व्या मुख्याधिकाऱ्यांची प्रतीक्षा आहे. या पार्श्वभूमीवर मुख्याधिकारी त्यांचा कार्यकाळ पूर्ण होईपर्यंत देखील या ठिकाणी थांबले नसल्याने याबाबत चर्चा रंगू लागल्या आहेत. नगरपरिषदेत सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचीच सत्ता आहे. राष्ट्रवादीची एकहाती सत्ता, बहुमत असताना मुख्याधिकाऱ्यांना जवळपास एका वर्षाच्या कालावधीतच येथून काढता पाय घ्यावा लागतो, याचे संशोधन होण्याची गरज आहे. शहराच्या विकासात शासनाचे प्रतिनिधी म्हणून मुख्याधिकारी महत्त्वाची भूमिका बजावतात. मात्र, एकूण परिस्थितीनुसार या अधिकाऱ्यांना काम करण्यास अनुकूल वातावरण नसल्याची चर्चा जोर धरू लागली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शहराचा चेहरामोहरा बदलणारे प्रकल्प हाती घेतले आहेत. अगदी सकाळी ६ वाजता प्रत्येक ठिकाणी पोचत पवार व्यस्त दिनक्रमातून वेळ काढत विकासकामांची, दर्जाची पाहणी करीत आहेत. मात्र,सातत्याने बदलून जाणाऱ्या मुख्याधिकाऱ्यांमुळे उपमुख्यमंत्र्यांच्या शहर विकसनशील करण्याच्या प्रयत्नांना खीळ बसण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यात ७९ गावे झिका विषाणू संसर्गाबाबत अतिसंवेदनशील म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केली आहेत. मागील तीन वर्षांत सातत्याने डेंग्यू व चिकुनगुनियाचा उद्रेक झालेली ही गावे असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी नमूद केले आहे. यामध्ये बारामती शहरातील आनंदनगर, सूर्यनगरी, तांदूळवाडी, कटफळ, सटवाजीनगर, अमराई आदी भाग आहे. मात्र, नगरपालिकेचे मुख्याधिकारी पद रिक्त असल्याने आरोग्य विभागाला अनेक ठिकाणी निर्णय घेताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. नगरपालिकेतील अनेक छोट्या-छोट्या गोष्टींसाठी प्रांताधिकाऱ्यांकडे नगरपालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना धाव घ्यावी लागत आहे. त्यामुळे नगरपालिकेत निर्णयप्रक्रिया संथगतीने सुरू आहे. त्याचा फटका अनेक दैनंदिन कामाला बसत आहे. आजाराची टांगती तलवार असताना याच कठीण काळात गेल्या ५० दिवसांपासून बारामती नगरपरिषद मुख्याधिकाऱ्यांविना कारभार हाकत आहे.

चौकट

माजी ज्येष्ठ नगरसेवक सुभाष ढोले यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले की, बारामती नगरपरिषदेच्या आजपर्यंतच्या इतिहासात प्रथमच असे घडत असेल. गेल्या पाच वर्षांत बदलून गेलेल्या मुख्याधिकाऱ्यांची परिस्थिती पाहता ही चिंतेपेक्षा चिंतनाची बाब आहे.

———————————————

...कोणी ‘सीओ ’देता का ‘सीओ’

राज्यातील सर्वाधिक बजेट असणाऱ्या सुसंस्कृत नगरपरिषदेला किमान ३ वर्षांचा कालावधी व्यवस्थित पार पाडतील असे ‘अ’ वर्ग दर्जाचे मुख्याधिकारीसाहेब लवकर मिळतील का, ते कोणाच्याही दबावाला बळी पडणारे नसावेत. सर्वांना समावून घेणारे असावेत, अशी पोस्ट नगरपरिषदेचे विरोधी पक्षनेते सुनील सस्ते यांनी काही दिवसांपूर्वी केली आहे.