नसरापूर : गावात कोणत्या जागेत कोणते आरक्षण आहे याची माहिती पीएमआरडीएने ग्रामपंचायतीना अथवा ग्रामस्थांना नकाशाद्वारे देऊन जनजागृती केल्यानंतरच हरकती मागवणे गरजेचे होते. मात्र तसे झाले नाही. पीएमआरडीएमुळे विकास व्हावा पण अडचणी व गैरसोयी नको असे जिल्हा परिषद माजी सदस्य चंद्रकांत बाठे यांनी सांगितले.
विघ्नहर्ता प्रतिष्ठानच्या वतीने पीएमआरडीए आराखडाबाबत जनजागृती मोहीम हाती घेण्यात आली असून केंजळ (ता. भोर) येथे २८ गावांतील सरपंच, उपसरपंचाना पीएमआरडीए आरक्षण कसे आहे. यासंदर्भातील विघ्नहर्ता प्रतिष्ठानतर्फे फ्लेक्स नकाशाचे वाटप करण्यात आले. त्यावेळी जि. प. चे माजी सदस्य चंद्रकांत बाठे बोलत होते.
लोकांच्या जनहितासाठी उपक्रम राबवत असून प्रारूप विकास आराखड्यात शेतकऱ्यांना गावात कोणते झोन अथवा प्रारूप रस्ता कोणत्या मार्गाने जाणार आहे. आपली जमीन जात आहे की नाही. याबाबत माहिती मिळेल. तसेच शेतकरी भूमिहीन अथवा त्याचे नुकसान होऊ नये यासाठी फ्लेक्स नकाशा प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये कायमस्वरूपी लावावा, असे आवाहन बाठे यांनी यावेळी केले.
यावेळी माजी आदर्श जि. प. सदस्य चंद्रकांत बाठे, माजी सभापती सुनीता बाठे, राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस प्रकाश तनपुरे, भरत बोबडे, सरपंच कविता बाठे, उपसरपंच किरण येवले, राकेश बाठे, सौरभ बाठे, काळुराम महांगरे, पांडुरंग बाठे तसेच राजापूर, सारोळा, गुणद, टापरेवाडी, पेंजळवाडी, किकवी, धांगवडी, निगडे, दिवळे, देगाव, नायगाव, करंदी, कामथडी सरपंच व व शेतकरी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकाश तनपुरे यांनी केले.
--
फोटो ०२नसरापूर प्रारूप नकाशे वाटप
फोटो - पीएमआरडीएचे प्रारूप नकाशे वाटप करताना जि. प. चे माजी सदस्य चंद्रकांत बाठे, माजी सभापती सुनीता बाठे आदी मान्यवर.
020921\img-20210901-wa0015.jpg~020921\02pun_3_02092021_6.jpg
पीएमआरडीए चे प्रारूप नकाशे वाटप करताना जि.प.चे माजी सदस्य चंद्रकांत बाठे,माजी सभापती सुनिता बाठे आदी मान्यवर.
~फोटो ०२नसरापूर प्रारूप नकाशे वाटपफोटो - पीएमआरडीए चे प्रारूप नकाशे वाटप करताना जि.प.चे माजी सदस्य चंद्रकांत बाठे,माजी सभापती सुनिता बाठे आदी मान्यवर.