चाकण : पुणे ते नाशिक या राष्ट्रीय महामार्गासह तळेगाव - शिक्रापूर राज्य मार्गाला वाहतूककोंडी मुक्त करण्याकरिता आराखडा तयार केला असून वरील महामार्गाला जोडणाऱ्या रस्त्यांच्या रुंदीकरणासह नूतनीकरण करण्यासाठी पीएमआरडीच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देण्याची मागणी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी केली आहे.
चाकण शहरातून पुणे नाशिक या राष्ट्रीय महामार्गासह तळेगाव शिक्रापूर या दोन्ही महामार्गावर आंतरराष्ट्रीय दर्जाची औद्योगिक वसाहत आहे.यामुळे सतत लहान मोठे वाहनांची वाहतूक सुरू असते.अरुंद रस्ते,अतिक्रमण यामुळे सतत वरील मार्गांवरील चौकांमध्ये सततच्या वाहतूक कोंडीने वाहनचालक पुरते वैतागून गेले आहेत.मोशी जकात नाका ते राजगुरूनगर पर्यंतच्या दरम्यानच्या रस्त्याचे काम मंजूर झाले आहे.तसेच तळेगाव दाभाडे ते सुधापूल याही मार्गाचे काम मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले जात असले तरी अजूनही प्रलंबित आहे. वाढत्या औद्योगिक क्षेत्राने वाहनांची वाढत्या संख्येने अपघाताचा रोजचा आलेख वाढत आहे.
पुणे नाशिक या राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला सुरुवात झाल्यावर वाढणाऱ्या वाहतुकीला पर्यायी मार्ग असणे गरजेचे आहे.तसेच सध्याच्या वाढत्या वाहतूक कोंडीला कमी करण्यासाठी आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी वाहतूक कोंडी मुक्त आराखडा तयार केला आहे.वरील दोन्ही मार्गांना जोडणाऱ्या रस्त्यांच्या नूतनीकरणासह रुंदीकरण करण्यात यावे यासाठी पीएमआरडीच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देण्याची मागणी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे.
पर्यायी सात मार्गांचे ५.५० मीटर रुंदीकरणासह डांबरीकरण करण्याची मागणी करण्यात आली आहे. वरील सर्व मार्ग रिंग रोड पद्धतीने विकसित केल्यास दळणवळण वाढीस लागून वरील भागातील गावांचा विकास होऊ शकतो.तसेच औद्योगिक वसाहतीसह मुख्य महामार्गांवरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी मोठा फायदा होईल, अशी माहिती आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी लोकमतशी बोलताना दिली.
पर्यायी मार्ग पुढीलप्रमाणे आहेत -
करंजविहिरे खिंड - धामणे फाटा - कडूस - चांडोली मार्गे पुणे नाशिक पर्यंत.
चाकण राज्य मार्ग १२७ - काळूस प्रजिमा ७२
प्रजिमा २० काळूस - माळवाडी भीमा नदीवर १०० मीटर पूल करून दावडी गावापर्यंत पुढे खेड सेझ पर्यायी मार्ग पुढे केंदूरमार्गे शिरूर पर्यंत.
प्रजिमा ६९ दावडी ते निमगाव राज्य महामार्ग १०३ पर्यंत.
प्रजिमा ७२ पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्ग वाकी फाटा ते भोसे राज्य महामार्ग ५५ पर्यंत.
प्रजिमा १७ चिंबळी इतर जिल्हा मार्ग ५२ शिंदे वासुली पर्यंत.
इतर जिल्हा मार्ग ५८ रासे ग्रामीण मार्ग ५९ चिंबळी ते पुणे नाशिक पर्यंत.
प्रस्तावित रस्ते नकाशा
३१ चाकण