जिल्हा नियोजन समितीच्या जलसंधारण विभागाच्या टंचाई आराखड्यातून ६ लाख ६० हजार रुपये विकास निधी देण्यात आला आहे. टंचाई आराखड्यातून दुष्काळ निवारण योजनेच्या माध्यमातून देऊळगावगाडा ग्रामपंचायतीला विशेष निधीची तरतूद करण्यात आली आहे. या निधीच्या माध्यमातून विहिरींचे खोलीकरण करणे, गाळ काढणे ही कामे करण्यात आली आहेत. या खोलीकरणाच्या माध्यमातून विहीर पुनर्भरण होऊन पाणीसाठ्यात वाढ होऊन आगामी काळातील पाणीटंचाईची समस्या दूर होण्यास मदत होईल. गावातील असलेल्या ओढ्यालगतचे बंधारे दुरुस्तीची कामे देखील ग्रामपंचायतीने या निधीच्या माध्यमातून हाती घेतली आहेत. नवीन बंधारे बांधणे, जुने बंधारे दुरुस्ती करणे, की वॉल बदलणे, पिचिंग, भराव बांधणे इत्यादी कामे ही या योजनेच्या माध्यमातून शितोळे वस्ती, आठजन वस्ती, बारवकर-मोरे वस्ती, शिंदे वस्ती या ठिकाणी सुरू करण्यात आली आहे.
२६खोर
देऊळगावगाडा (ता. दौंड) येथे जलसंधारण विभागाच्या माध्यमातून जिल्हा नियोजन समितीतून विकास कामे सुरू केली.