ब्राह्मणगाव : येथे डेंग्यूसदृश रुग्णांची संख्या पाहता ग्रामपंचायतीतर्फे परिसरात डास प्रतिबंधक फवारणी करण्यात आली. दरम्यान, ग्रामस्थांना साठवणुकीच्या पाण्याबाबत काळजी घेण्याचे व आठवड्यातून एक कोरडा दिवस पाळण्याचे आवाहन ग्रामपंचायतीतर्फे करण्यात आले आहे. गावातील एकाच गल्लीत ११ रुग्ण डेंग्यूसदृश आढळल्याने खळबळ उडाली होती. त्यात खासगी डॉक्टरांनी केलेल्या तपासणीत डेंग्यूची लक्षणे आढळली, मात्र बहुसंख्य रुग्णांच्या शासकीय तपासणीचा अहवाल हा नकारार्थी आलेला होता. या तपासणी अहवालातील तफावतीमुळे ग्रामस्थांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. आता सर्व रुग्ण बरे झाले असले तरी बहुतांश रुग्णांनी खासगी दवाखान्यातच उपचार घेणे पसंत केले आहे. ग्रामपंचायतीतर्फे गावात सर्वत्र गटारींची साफसफाई व कीटकनाशक फवारणी करण्यात आली आहे. सरपंच सुभाष अहिरे व ग्रामपंचायत सदस्य यांनी गावातील घरोघरी जाऊन साठवणुकीच्या पाण्याबाबत काळजी घेण्यात यावी व घरातील सर्व भांडे कोरडे करून ठेवत आठवड्यातून एक कोरडा दिवस पाळण्याचे आवाहन केले आहे. (वार्ताहर)
गणपत गायकवाड यांच्या निधीतून विकासकामे
By admin | Published: June 14, 2014 1:20 AM