पुणे : यापूर्वी काही लोकांनी महाराष्ट्र पोलिसांच्या नाव बदनाम करण्याचा प्रयत्न केला आहे. पण पोलिस खात्याचे नावलौकिक पुन्हा मिळालं पाहिजे यासाठी पोलिसांनी काम केलं पाहिजे, अशा सूचना राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांना केल्या. फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सिनियर पोलीस अधिकाऱ्यांची क्राईम कॉन्फरन्स आयोजित करण्यात आली होती.
पुण्यात सिनियर ऑफिसर यांची क्राईम कॉन्फरन्स आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी फडणवीसांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले, या कॉन्फरन्समध्ये वेगवेगळ्या विषयांवर प्रेझेंटेशन केले होते. यात वेगवेगळ्या घटकांमध्ये युनिटमध्ये गुन्ह्यांची परिस्थिती काय आहे. प्लॅनिंग काय आहे, याबाबत परमार्ष घेण्यात येतो. 2022 वर्षात वेगवेगळ्या गुन्ह्यांबाबत आढावा घेण्यात आला आहे. यात कुठेकुठे वाढ आहे, कुठे कमतरता आहे यावर लक्ष दिलं. जिथे वाढ आहे त्यामागील कारण काय आहे. याबाबत चर्चा करण्यात आल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
तसेच यापुढे ते म्हणाले की, ज्याप्रमाणे मधल्या काळात काही लोकांनी महाराष्ट्र पोलिसांच्या नावाला बट्टा लावला आहे. तो संपवावा लागेल आणि पोलीस खात्याला नावलौकिक पुन्हा मिळालं पाहिजे, यासाठी पोलिसांनी काम केलं पाहिजे. तसेच ड्रगच्या विरोधात एक विशेष मोहीम रबिविण्यात येणार आहे.