शहरं
Join us  
Trending Stories
1
Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचारसभेत मोठा राडा; अंगावर खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न! 
2
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
3
भाजपने अनेक राज्यांत भ्रष्टाचारातून सत्ता मिळवली, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा मोठा आरोप
4
Mumbadevi Vidhan Sabha 2024: शायना एन.सी. विरुद्ध अमीन पटेल; गड राखण्याचे काँग्रेससमोर आव्हान! 
5
Maharashtra Election 2024 Live Updates: 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर अजितदादांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला
6
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
7
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
8
इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या निवासस्थानावर बॉम्बहल्ला
9
"मराठा समाजाला आरक्षण आमच्या सरकारनेच दिले"; रावसाहेब दानवे यांची विशेष मुलाखत   
10
Maharashtra Vidhan Sabha 2024: 'भाजपच्या बोलण्यातून दिसतेय भेदरलेली स्थिती'; सचिन पायलट यांचा दावा
11
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
12
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
13
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
14
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
15
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
16
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
17
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
18
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
19
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
20
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत

चर्चा तर होणारच ! देवेंद्र फडणवीस अन् चंद्रकांत पाटील पुण्यात; पण वेगवेगळ्या कार्यक्रमांना उपस्थित

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2021 1:30 PM

दादा आणि भाउंच्या वादात फडणवीसांनीच शहराकडे लक्ष द्यायचं ठरवलंय की काय

प्राची कुलकर्णी -

पुणे :भाजप नेते व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे आज पुणे दौऱ्यावर आहे. याचवेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे देखील पुण्यातच आहे. मात्र फडणवीस आणि पाटील हे पुण्यातील दोन वेगवेगळ्या कार्यक्रमांना उपस्थित आहे. यामुळे फडणवीसांच्या पुणे महानगरपालिका भेटी दरम्यान चंद्रकांत पाटील हे अनुपस्थित होते. याच मुद्द्यांवरून राजकीय तर्क वितर्काना उधाण आले होते. पण भाजपकडून याबाबत खुलासा देण्यात आल्यामुळे या विषयावर पडदा पडला.

पुणे महानगरपालिकेला देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी भेट दिली. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी फडणवीस यांनी पुणे महानगरपालिकेच्या विकासकामांची माहिती जाणून घेतानाच विविध मुद्द्यांवर भाष्य देखील केले आहे. पण पुणे महापालिकेतल्या विकास कामांचा आढावा बैठकीला प्रदेशाध्यक्ष आणि कोथरुडचे आमदार चंद्रकांत पाटिल मात्र अनुपस्थित राहीले आहेत. विशेष म्हणजे या बैठकीला पदाधिकाऱ्यांव्यतिरिक्त फक्त आमदार आणि खासदारांच आमंत्रण होतं. पाटिल यांच्या अनुपस्थितीमुळे राजकीय चर्चाना उधाण आले असते तर नवलच म्हणावे लागले असते. 

विशेष म्हणजे या बैठकीच्या वेळीच चंद्रकांत पाटील हे पुण्यातच उद्योग आघाडीच्या मेळाव्याला संबोधित करणार आहेत. महत्वाचं म्हणजे यापुर्वी चंद्रकांत पाटीलांनी गेल्या दोन महिन्यात आयुक्तांसोबत अशाच दोन बैठका घेतल्या आहेत. त्यामुळे पुण्याच्या महत्वाच्या प्रश्नांवर चर्चा होत असताना इतर वेळी यासाठी आग्रह असणारे पाटील आज गैरहजर कसे काय याची चर्चा रंगली आहे.

दरम्यान, फडणवीस आणि पाटील यांचे वेगवेगळे कार्यक्रम ठरलेले असुन या बैठकांनंतर ते पुण्यात भेटणार असल्याचे भाजपचे शहर प्रवक्ते संदीप खर्डेकर यांनी सांगितले.

 

टॅग्स :PuneपुणेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसchandrakant patilचंद्रकांत पाटीलPoliticsराजकारणPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका