बारामती: राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला बारामतीतअजित पवार यांच्या सत्तानाट्याच्या दुसऱ्या दिवशी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बॅनरबाजीने बारामतीकरांचे लक्ष वेधले. देवेंद्र फडणवीस चाणक्य लिहिलेला बॅनर बारामती मध्ये झळकला असून बारामती येथील नगर परिषदेच्या समोर हा लावण्यात आलेला आहे. त्याचबरोबर उपमुख्यमंत्रीपदी अजित पवार यांची उपमुख्यमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल भाजप कार्यकर्त्यांनी त्यांना शुभेच्छाचा बॅनर लावल्याने सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
नागपूरनंतर आता पुण्यात देवेंद्र फडणवीस यांचे बॅनर दिसून आले आहेत. त्यांच्याबरोबर अजित पवारांचा फोटो लावून उपमुख्यमंत्री झाल्याबद्दल अभिनंदन करण्यात आले आहे. तर बारामतीतच दुसरीकडे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी ‘दादां’चा फोटो लावत ‘आमचा विठुराया’ संबोधत बॅनर लावले. केवळ बॅनर लावुन कार्यकर्ते थांबले नाहीत. ‘एकच वादा अजितदादा’,‘अजितदादा तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है’च्या घोषणा दिल्या आहेत. परंतु दोन्ही बॅनरवरून शरद पवार यांचा फोटो नसल्याचे दिसून आले आहे.
बारामतीत शरद पवारांची रणनीती कशी असेल, ज्या बारामतीच्या बळावर त्यांनी देशात ओळख निर्माण केली. त्यांच्यामुळे बारामती देशाच्या राजकारणात ओळखली जाते. त्या बारामतीचे राजकारण भविष्यात कोणत्या दिशेने जाणार, या विचारानेच बारामतीकर धास्तावले आहेत. बारामतीत पवार कुटुंबीय एकत्र रहावेत, अशीच बहुतांश बारामतीकरांची इच्छा आहे.