ब्राह्मण समाज नाराज नाही; कसबा हा हिंदुत्ववादी, भाजपच जिंकणार- देवेंद्र फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2023 08:01 PM2023-02-23T20:01:47+5:302023-02-23T20:16:46+5:30

फडणवीस म्हणाले, याठिकाणी काँग्रेसचा उमेदवार निवडून येणार नाहीच....

Devendra Fadnavis kasba by election Rumors that the Brahmin community is upset; Kasba is Hindutva, BJP will win | ब्राह्मण समाज नाराज नाही; कसबा हा हिंदुत्ववादी, भाजपच जिंकणार- देवेंद्र फडणवीस

ब्राह्मण समाज नाराज नाही; कसबा हा हिंदुत्ववादी, भाजपच जिंकणार- देवेंद्र फडणवीस

googlenewsNext

पुणे : कसबा पोटनिवडणुकीत अनेक अपप्रचार करण्याचे प्रयत्न केले. विविध समाज नाराज असल्याचे सांगितले, पण तसं काहीही नाही. कसबा हा हिंदुत्ववादी आहे. हे पुणे छत्रपती शिवरायांचे पुणे आहे. हे भाजपचं कसबा आहे, बापट यांनी कसबा मतदारसंघ बांधला आहे. याठिकाणी काँग्रेसचा उमेदवार निवडून येणार नाहीच.

यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले, ब्राह्मण समाज नाराज असल्याच्या फक्त अफवा निर्माण केल्या जात आहेत. काँग्रेसच्या उमेदवाराला पुणेश्ववर महादेवाबाबत भूमिका विचारा. या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून मतांचे धृवीकरण केले जात आहे. तसेच एमपीएससीच्या आंदोलनाबाबात काँग्रेसने दुटप्पी भूमिका घेतली आहे. आज कसबा मतदारसंघात देवेंद्र फडणवीसांची रॅली पार पडली. त्यावेळी त्यांनी महाविकास आघाडीवर कडाडून टीका केली.

भाजपचे अधिकृत उमेदवार हेमंत रासने यांच्या प्रचारासाठी कसबा मतदारसंघात रोड शो करण्यात आला होता. या रोड शोमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, रामदास आठवले, हर्षवर्धन पाटील, कुणाल टिळक होते.

Web Title: Devendra Fadnavis kasba by election Rumors that the Brahmin community is upset; Kasba is Hindutva, BJP will win

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.