पुणे : पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणच्या वतीने (पीएमआरडीए) ‘महाळुंगे-माण हायटेक सिटी’साठी ७०० एकर उभी करण्यात येणार आहे. मात्र यासाठी कोणालाही बेघर, भूमिहीन करणार नाही. तर प्रकल्पासाठी जागा देणाऱ्या शेतकऱ्यांना राज्य सरकार प्रकल्पात भागीदारी देणार आहे, असे आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बालेवाडी येथील क्रीडा संकुलात झालेल्या कार्यक्रमात उपस्थित सर्व शेतकऱ्यांना दिले. पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणच्या (पीएमआरडीए) ‘महाळुंगे-माण हायटेक सिटी’ ६२० कोटी रुपयांच्या पायाभूत सुविधांच्या विकास कामाच्या शुभारंभ फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते.याप्रसंगी जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, पालकमंत्र गिरीश बापट, सामाजिन न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, खासदार अनिल शिरोळे, आमदार बाबूराव पाचर्णे, संग्राम थोपटे, मेधा कुलकर्णी, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वास देवकाते, विभागीय आयुक्त दिलीप म्हैसेकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पीएमआरडीएचे आयुक्त किरण गित्ते, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे, पीएमआरडीएचे अतिरीक्त आयुक्त प्रवीणकुमार देवरे आदी मान्यवर उपस्थित होते.देवेंद्र फडणवीस म्हणाले, या हायटेक सिटीच्या पायाभूत सुविधांसाठी पीएमआरडीएच्या वतीने यापैकी ६०० कोटी रूपये खर्च करण्यात येणार आहे. अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्या यामध्ये गुंतवणूक करणार आहेत. साधारण दीड लाख लोकांना व्यावसायिक आणि रहिवासी कारणांसाठी या सिटीचा उपयोग करता येणार आहे. तीन वर्षानंतर यामधून पीएमआरडीएला उत्पन्न सुरू होणार आहे. ...................जलसंपदा मंत्र्यांकडून मुख्यमंत्र्यांचे तोंड भरून कौतुकराज्यात भाजप आणि शिवसेना हे पक्ष सत्तेत आहेत. मात्र शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे व इतर नेत्यांकडून रोज भाजपच्या नेत्यांवर टीका केली जाते. पीएमआरडीएच्या कार्यक्रमात मात्र शिवसेनेचे पुरंदरचे आमदार तथा जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अनेक कामांचे गुणगान केल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या. .......................हिंजवडी पुण्याचे ग्रोथ इंजिनगेल्या काही वर्षा पुणे शहराची वेगाने प्रगती होत आहे. अनेक उद्योग-व्यवसाय, आयटी हब हिंजवडी परिसरात आले आहेत. त्यामुळे पुण्याकडे देशातील वेगवेगळ्या शहरांबरोबच परदेशातील अनेक कंपन्या, विद्यापीठ आकर्षीत झाले आहे. त्यामुळे येणाºया काळात याठिकाणी हजारो कोटींची गुंतवणूक वाढणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थामधील पुणे जिल्हा परिषद, पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका बरोबर पीएमआरडीएने समन्वय साधून पायाभूत सुविधा उभ्या केल्या पाहिजेत. तरच पुण्याचे विकास वेगाने होईल, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. ........................मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पीएमआरडीएला नगर रचना विभागाच्या नियमानुसार १४ टीपी स्कीम उभ्या करण्याचे अधिकार दिले आहेत. त्याप्रमाणे आॅक्टोबर २०१८ साली नगर रचना लवाद नेमण्यात आला आहे. पीएमआरडीएच्या ‘महाळुंगे-माण हायटेक सिटी’ या महत्त्वकांशी योजनेला सर्व स्थानिक शेतकऱ्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे हा आदर्श प्रकल्प करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. येत्या एप्रिल २०१९ मध्ये या योजनेतील सर्व शेतकऱ्यांना प्रॉपर्टी कार्ड वाटप करण्यात येणार आहे. - किरण गित्ते, आयुक्त, पीएमआरडीए
‘महाळुंगे-माण’ हायटेक सिटीमध्ये भूमिपुत्रांना भागीदारी : देवेंद्र फडणवीस
By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2018 4:38 PM
पीएमआरडीएच्या ‘महाळुंगे-माण हायटेक सिटी’ या महत्त्वकांशी योजनेला सर्व स्थानिक शेतकऱ्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे हा आदर्श प्रकल्प करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत.
ठळक मुद्देपायाभूत सुविधांच्या विकास कामांचा शुभारंभ पीएमआरडीएला नगर रचना विभागाच्या नियमानुसार १४ टीपी स्कीम उभ्या करण्याचे अधिकार हायटेक सिटीच्या पायाभूत सुविधांसाठी पीएमआरडीएच्या वतीने ६०० कोटी रूपये खर्च ‘महाळुंगे-माण हायटेक सिटी’साठी ७०० एकर उभी करण्यात येणार येत्या एप्रिल २०१९ मध्ये या योजनेतील सर्व शेतकऱ्यांना प्रॉपर्टी कार्ड वाटप