'देवेंद्र फडणवीसांनी ५ वर्षांच्या काळात महाराष्ट्राचं वाटोळं केले', काँग्रेस नेते भाई जगताप यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2021 05:33 PM2021-12-01T17:33:20+5:302021-12-01T17:34:35+5:30

महाविकास आघाडीने कोरोनाच्या काळात देखील महाराष्ट्राचं स्थान देशात अबाधित ठेवलं

devendra fadnavis ruined in 5 years not developed maharashtra said congress leader Bhai Jagtap | 'देवेंद्र फडणवीसांनी ५ वर्षांच्या काळात महाराष्ट्राचं वाटोळं केले', काँग्रेस नेते भाई जगताप यांची टीका

'देवेंद्र फडणवीसांनी ५ वर्षांच्या काळात महाराष्ट्राचं वाटोळं केले', काँग्रेस नेते भाई जगताप यांची टीका

Next

पुणे : महाविकासआघाडीचे सरकार एक महिन्यात पडेल, दोन महिन्यात पडेल हे सर्व केल्याचा पश्चाताप देवेंद्र फडणवीस यांना झाला आहे. देवेंद्र फडणविसांच्या पाच वर्षाच्या काळात महाराष्ट्राची पीछेहाट झाली. त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र मोदींच्या दावणीला बांधला. मुंबईसारख्या ठिकाणी नरेंद्र मोदींना खुश करण्यासाठी त्यांनी पाच वर्ष महाराष्ट्राचं वाटोळं केलं. त्याचा पश्चाताप देवेंद्र फडणवीसांना व्हायला हवा. याउलट महाविकास आघाडीने कोरोनाच्या काळात देखील महाराष्ट्राचं स्थान देशात अबाधित ठेवलं. तर देवेंद्र फडणवीसांनी पाच वर्षांच्या काळात महाराष्ट्राचं वाटोळं केलं, अशा शब्दात काँग्रेसचे नेते भाई जगताप यांनी फडणवीस यांच्यावर टीका केली. ते पुण्यात बोलत होते.

मुंबईत काँग्रेस स्वबळावरच लढणार

''राज्यात जेव्हा आघाडी सरकार होते. तेव्हा देखील आम्ही एकमेकांविरोधात लढलो होतो. यात नवीन काही नाही. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लढण्याचा विषय आम्ही स्थानिक नेत्यांवर सोडतो. मुंबईत एकटे लढण्याचा निर्णय हा स्थानिक नेत्यांनी मिळून घेतलेला निर्णय आहे. आमची ही भूमिका राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांना कळवलेली आहे. आमच्या या निर्णयामुळे महाविकासआघाडी बिघाडी होणार असे काही नाही.

पुण्यावर बोलणं म्हणजे..

''पुणे महानगरपालिका देखील मुंबईप्रमाणेच एकटे लढणार का असे विचारले असता भाई जगताप म्हणाले, पुण्यावर काहीतरी बोलणे म्हणजे बाप रे बाप..तुम्हीच पुण्याविषयी काहीतरी सांगा आणि माझ्या ज्ञानात अधिक भर टाका, असे म्हणत त्यांनी यावर बोलणे टाळले.'' 

Web Title: devendra fadnavis ruined in 5 years not developed maharashtra said congress leader Bhai Jagtap

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.