बारामती लोकसभेचे शिवसेना संपर्क प्रमुख सत्यवान उभे यांच्या मार्गदर्शनाखाली देवकाबाई वाघमारे यांची निवड शिवसेनेकडून करण्यात आली आहे. कोळवडे ग्रामपंचायतीमध्ये एकूण सहा सदस्य असून सरपंच पदासाठी देवकाबाई वाघमारे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची कोळवडे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली, तर उपसरपंचपदासाठी जनार्दन उभे व वसंत उभे या दोघांचे अर्ज आले होते. त्यावेळी जनार्दन उभे यांनी वसंत उभे यांचा ४-२ असा मताच्या फरकाने पराभव केल्याने कोळवडे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी त्यांची निवड करण्यात आली. निवडणूक अधिकारी म्हणून राजेंद्र भालेराव व ग्रामसेविका खुडे यांनी काम पाहिले.
यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख संतोष मोहोळ, जि.प.सदस्य सागर काटकर, प्रकाश भेगडे, जिल्हासंघटीका महीला आघाडी संगिता पवळे, शिवसेना समन्वयक भोर-वेल्हा-मुळशी कैलास मारणे, उपतालुकाप्रमुख शिवाजी उभे, नागेश साखरे, युवासेनेचे कार्याध्यक्ष अविनाश कानगुडे, युवानेते अमित कुडले, सुरेश मारणे, देविदास उभे, सोमनाथ उभे, अनिल उभे, किसन लेकावळे, सुनिल उभे, समीर शिंदे, राजेंद्र मारणे, रमेश मोगल उपस्थित होते.
--
फोटो क्रमांक : ११पिरंगुट कोळावडे सरपंच निवड
फोटो ओळ : कोळावडे ग्रामपंचायतीचे नवनिर्वाचित सरपंच व उपसरपंच यांच्या सत्कार समारंभ करताना पदाधिकारी कार्यकर्ते