ओझर (पुणे): ओझर राज्यातील गणेशभक्त अष्टविनायक गणपती दर्शन (Ashtavinayaka ganpati) हे श्रद्धा म्हणून चोवीस तासांत पूर्ण करतात; परंतु ज्या गणेश भक्तांकडे वेळ कमी आहे अशा व्हीआयपी भक्तांसाठी अष्टविनायक गणपतींचे दर्शन हेलिकॉप्टरद्वारे फक्त पाच तासांत करता येणार आहे. तर सर्वसामान्य भक्तांसाठी वातानुकूलित बसद्वारे व्हीआयपी दर्शनाचा उपक्रम अष्टविनायकातील मुख्य स्थान श्री क्षेत्र ओझर येथील श्री विघ्नहर गणपती 'देवस्थानच्या वतीने सर्व विश्वस्त व ग्रामस्थांना विश्वासात घेऊन राबविणार असल्याची माहिती देवस्थानचे अध्यक्ष गणेश कवडे यांनी दिली.
अधिक माहिती देताना त्यांनी प्रशासकीय मान्यता मिळविण्याचे सांगितले की, देवस्थान आठ व्यक्तींचे प्रयत्न सुरू आहेत. ओझर या आसन क्षमता असलेले हेलिकॉप्टर ठिकाणाहून विघ्नहर्त्या गणपतीचे भाडेकरारावर घेणार आहे. अष्टविनायकातील सर्व देवस्थानाबरोबर संपर्क झाला असून हेलिकॉप्टरच्या प्रवासासाठी सर्व प्रशासकीय मान्यता मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
कसा असेल प्रवास-
ओझर या ठिकाणाहून विघ्नहर्त्या गणपतीचे दर्शन घेऊन तीर्थयात्रेला सुरूवात होणार आहे. रांजणगाव (महागणपती) यांच्याबरोबर संपर्क झाला असून, सिद्धटेक (सिद्धिविनायक), थेऊर (चिंतामणी), मोरगाव (मयूरेश्वर), महाड (वरदविनायक), पाली (बल्लाळेश्वर) व शेवटी लेण्याद्रीच्या गिरीजात्मज गणपतीचे दर्शन झाल्यानंतर वातानुकूलित बसद्वारे भाविकांना ओझर येथे आणण्यात येणार आहे.
भाविकांच्या हस्ते होणार महाभिषेक-
अष्टविनायक यात्रा बुकिंग करणाऱ्या भाविकांना ओझर या ठिकाणी तीर्थयात्रेच्या अगोदरच्या दिवशी व्हीआयपी भक्तभवनमध्ये मुक्काम, तसेच महाप्रसाद व्यवस्था करण्यात येणार आहे. सकाळी साडेसहा वाजता श्रींना भाविकांच्या हस्ते महाभिषेक करण्यात येणार आहे. भाविक आठ वाजता तीर्थयात्रेला हेलिकॉप्टरने रवाना होणार असून, दुपारी एक वाजता लेण्याद्री या ठिकाणी यात्रा पूर्ण करून येणार आहेत व गिरीजात्मकाचे दर्शन झाल्यावर बसद्वारे ओझर येथे आल्यावर तीर्थयात्रेची सांगता होणार आहे.
वातानुकूलित बसद्वारे दर्शनाची सोय-
सर्वसामान्य भाविकांनादेखील वातानुकूलित बसद्वारे अष्टविनायक दर्शन घडविण्याचा देवस्थानचा मानस आहे. या भाविकांनादेखील श्रींचे दर्शन घेताना रांगेत दर्शन घ्यावे लागणार नाही. तीर्थयात्रा करणाऱ्या भाविकांना थेट दर्शन व्यवस्था करण्यात येणार आहे व या भाविकांनादेखील तीर्थयात्रेच्या अगोदरच्या दिवशी मुक्काम, महाप्रसाद, दर्शन, अभिषेक व्यवस्था करण्यात येणार आहे.