शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
2
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
3
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
4
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
5
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
6
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
7
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
8
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
9
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
10
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
11
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
12
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
13
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
14
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
15
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
16
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
17
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
18
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
19
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
20
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात

पंढरपुरात उभारले भक्तनिवास

By admin | Published: April 24, 2017 4:26 AM

येथील श्री क्षेत्र रामदरा शिवालय यांच्या वतीने तीर्थक्षेत्र पंढरपूर येथे धर्मशाळा उभारण्यात आल्याने लोणी काळभोर येथील भाविक

लोणी काळभोर : येथील श्री क्षेत्र रामदरा शिवालय यांच्या वतीने तीर्थक्षेत्र पंढरपूर येथे धर्मशाळा उभारण्यात आल्याने लोणी काळभोर येथील भाविक व वारी करणाऱ्या विठ्ठलभक्तांना हक्काच्या निवाऱ्याची सोय झाली आहे.लोणी काळभोर येथील अंबरनाथ रामदरा शिवालय प्रासादिक दिंडीतील सुमारे ८00 वारकरी प्रत्येक आषाढ, कार्तिकी व माही वारीसाठी पंढरपूर येथे गेल्या अनेक वर्षांपासून जातात. परंतु तेथे मुक्काम करताना त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असे. ही अडचण लक्षात आल्यानंतर श्री क्षेत्र रामदरा शिवालयाचे महंत हेमंतपुरी महाराज यानी पंढरपूर येथील जुना अकलूज रोडनजीकच्या बैलबाजाराशेजारी ११ गुंठे जागा घेतली. त्यामध्ये ४५०० स्क्वेअर फुटाचा हॉल बांधला आहे.मंदिरात शुक्रवारी (दि. २१) विठ्ठल-रुक्मिणी, श्रीराम, श्रीमंत अंबरनाथ, मारुती, गरूड यांचेसमवेत श्रीमहंत १००८ देवीपुरी महाराज ऊर्फ धुंदीबाबा, मंगलपुरी महाराज व मंगलपुरी महाराज यांच्या मूर्तींची श्री क्षेत्र रामदरा शिवालयाचे महंत हेमंतपुरीमहाराज यांचे हस्ते तसेच विधिवत प्रतिष्ठापना केली. ५० साधूंसमवेत अंबरनाथ रामदरा शिवालय प्रासादिक दिंडीचे अध्यक्ष विनोदमहाराज, दिंडीतील सर्व सदस्य तसेच लोणी काळभोरसह पुणे, पिंपरी-चिंचवड, बेलावडे (सातारा) येथील सुमारे भाविक उपस्थित होते. तत्पूर्वी विठ्ठल-रुक्मिणी मंदिर प्रदक्षिणा मार्ग ते धर्मशाळा या दोन किमी अंतरावर मूर्तींची ढोलताशांच्या निनादात मिरवणूक काढली होती. धर्मशाळा उभारणी ते मूर्तींची प्रतिष्ठापना यासाठी सुभाष कुदळे, शिवाजी काळभोर, संतोष जगताप (आळंदी देवाची), रामभाऊ बनकर, गोविंद काळभोर, बापू देवडे, धोंडिबा काळभोर यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. (वार्ताहर)