सासवडला श्री संत सोपानदेव महाराज संजीवन समाधी घेतेवेळी प्रत्यक्ष श्री पांडुरंग तेथे आले होते, त्या वेळी पांडुरंग कऱ्हाकाठी विश्रांतीसाठी थांबले होते तेथेच मंदिर बांधण्यात आले व विठ्ठलाच्या विश्रांतीमुळे ते विसावा विठ्ठल मंदिर म्हणून गणले गेले, अशी आख्यायिका सांगितली जाते. सध्या किरण व तुळशीदास पुरंदरे यांच्याकडे या मंदिराची मालकी असून श्री विठ्ठल रुक्मिणी पुरंदरे ट्रस्ट नावाने ते ओळखले जाते.
दरम्यान आज भल्या सकाळी मंदीरात यतीन पुरंदरे वअर्चना पुरंदरे यांनी अभिषेक, महापूजा व तत्सम धार्मिक विधी पार पाडले. उत्तम एक्के आणि कुमार मेरुकर यांनीही अभिषेक पूजा विधी केले. महाआरती होऊन मंदिर बंद करण्यात आले. दिवसभर भाविकांनी मंदिराबाहेरून मुख दर्शन व कळस दर्शन घेतले. सायंकाळी मोजक्या मंडळींसह हनुमान प्रासादिक भजन मंडळाची भजन सेवा झाली. मंदिराचे मालक तुलसीदास व किरण पुरंदरे यांच्यासह सुहास शिवले, सौरभ जगताप, आरती पुरंदरे, बोरकर कुटुंबीय यांनी सर्व धार्मिक विधींचे आयोजन केले होते. सलग दुसऱ्या वर्षीही करोनामुळे विठ्ठल दर्शन न झाल्याने अनेक भाविकांनी खंत व्यक्त केली.
--
फोटो क्रमांक : २० सासवड आषाढी विठ्ठल मंदिर
फोटो.. सासावड येथील विसावा विठ्ठल मंदिरातील श्री विठ्ठल मूर्ती
200721\20pun_1_20072021_6.jpg
फोटो क्रमांक : २० सासवड आषाढी विठ्ठल मंदिरफोटो.. सासावड येथील विसावा विठ्ठल मंदिरातील श्री विठ्ठल मूर्ती