पुणे : धायरी येथील जलवाहिनीतून होणारी गळती थांबविणे व अन्य कामांसाठी येत्या गुरुवारी (दि. २४) धायरी व लगतच्या परिसराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
तर शुक्रवारी सकाळी उशिरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होईल. जुनी धायरी येथे मुख्य दाब जलवाहिनीमधून पाण्याची होणारी गळती थांबविणे व पारी कंपनी रस्ता येथे स्थापत्य विषयक तातडीचे देखभाल दुरुस्तीचे काम केले जाणार आहे. त्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
पाणीपुरवठा बंद असणारा भाग पुढीलप्रमाणे :पारी कंपनी रोड, गणेशनगर, लिमयेनगर, गारमळा, गोसावी वस्ती, बारांगणी मळा, दळवी वाडी, कांबळे वस्ती, मानस परिसर, नाईक आळी, यशवंत विहार बूस्टर वरील संपूर्ण परिसर, गल्ली क्र १० ते ३४ अ व ब दोन्ही बाजू, रायकरनगर, चव्हाण बांग, त्रिमूर्ती हॉस्पिटल परिसर आदी.