"अजित पवारांच्या बदनामीचा डाव, त्यांना राजकारणातून संपविण्याचे षडयंत्र"

By नितीन चौधरी | Published: October 17, 2023 05:45 PM2023-10-17T17:45:36+5:302023-10-17T17:47:44+5:30

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निष्कारण आरोप केले जात असून...

dhananjay munde said "Ploy to defame Ajit Pawar, Conspiracy to eliminate him from politics" | "अजित पवारांच्या बदनामीचा डाव, त्यांना राजकारणातून संपविण्याचे षडयंत्र"

"अजित पवारांच्या बदनामीचा डाव, त्यांना राजकारणातून संपविण्याचे षडयंत्र"

पुणे : येरवडा येथील जागेसाठी ‘पीपीपी’ तत्वावर निविदा राज्याच्या तत्कालीन गृहमंत्र्यांच्या आदेशानेच काढण्यात आली. त्यांनीच ती रद्द केली होती. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निष्कारण आरोप केले जात असून, राज्याच्या विकासाची स्वप्ने पाहणाऱ्या जनसेवकाला बदनाम करण्याचे व राजकारणातून संपविण्याचे षडयंत्र केले जात आहे,’ अशी टीका कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी केली.

पुण्यातील साखर संकुल येथे आयोजित रब्बी हंगामाच्या आढावा बैठकीपूर्वी ते पत्रकारांशी बोलत होते. माजी आयपीएस अधिकारी व पुण्याच्या तत्कालीन पोलिस आयुक्त मीरा बोरवणकर यांनी येरवड्याच्या जागेबाबत उपमुख्यमंत्री व तत्कालीन पालकमंत्री अजित पवार यांनी एका खासगी विकासकाला देण्यासाठी आग्रह धरल्याचा दावा पुस्तकातून केला आहे. त्याबाबत मुंडे म्हणाले, “तत्कालीन गृहमंत्र्यांच्या आदेशानेच ही निविदा काढण्यात आली. त्यावेळी तक्रार करण्याऐवजी निवृत्त झाल्यावर पुस्तकात दावे करून एखाद्याला बदनाम करणे मोठ्या अधिकाऱ्यांना शोभणारे नाही. तत्कालीन गृहमंत्र्यांनीच या जागेची निविदा रद्द केली आहे. तरीही जागा वाचविल्याचे श्रेय घेण्यासाठी अजित पवार यांच्यावर आरोप केले जात आहेत.”

मुख्यमंत्रीपद का सोडले ते दैवताला माहिती-

नेतृत्वाने मुख्यमंत्री व्हावे, हे प्रत्येक कार्यकर्त्याचे वाटते. मात्र, राष्ट्रवादीला संधी असताना, मुख्यमंत्रीपद सोडले. त्यामुळे कार्यकर्त्यांचे स्वप्न पूर्ण करायचे होते की नाही, याचे उत्तर आमच्या दैवताकडे आहे, असा निशाणाही मुंडे यांनी अप्रत्यक्षपणे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर साधला.

Web Title: dhananjay munde said "Ploy to defame Ajit Pawar, Conspiracy to eliminate him from politics"

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.