शहरं
Join us  
Trending Stories
1
मतांमधील तफावतीबाबत 'लोकमत'च्या बातमीवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, म्हणाले...
2
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
4
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
5
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
6
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
7
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
8
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
9
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
10
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
11
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
12
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
13
विद्यार्थ्यांच्या नोंदणीसाठी शिक्षकांचे 'अपार' कष्ट; २५ टक्के नोंदणी अपूर्ण
14
शेती आणि शेतकरी - यंदाच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतून दोघेही हद्दपार!
15
‘कॉर्पोरेट’ प्रचार, फतवे अन् व्हायरल इंडिया; निवडणुकीचा प्रचार झालाय हाय-टेक
16
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

धनकवडी, बिबवेवाडीत आगीचे थैमान, सलग दोन दिवस आगीच्या घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2018 1:49 AM

सलग दोन दिवस आगीच्या घटना : जीवितहानी नाही, वेळेवर येऊनही दोन्ही ठिकाणी अग्निशमन बंबांना नाही आले पोहोचता

धनकवडी : येथील क्रांतिसूर्य महात्मा फुले चौक परिसरातील विष्णू उर्फ अप्पासाहेब जगताप क्रीडा संकुलातील अडगळीत साठलेल्या टाकावू साहित्याच्या ढिगाला आग लागली. ही आग पसरून शेजारील अंगणवाडीत पोेहोचली व तेथील कपाट आणि काही साहित्य जळून खाक झाले. बुधवारी दुपारी अचानक लागलेली आग विझविण्यात आग्निशामक जवानांना यश आले. जलतरण तलावातील पंपामध्ये शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असल्याचे सांगण्यात आले.

क्रीडा संकुलाच्या इमारतीत अंगणवाडी भरते. बालदिन साजरा करण्यासाठी विद्यार्थी अंगणवाडीत उपस्थित होते. महाराष्ट्र शासनाची एकात्मिक बालविकास योजनेतील बालविकास प्रकल्प शाळा क्रमांक १३९ मध्ये अंगणवाडीचालिका शैला भैरवनाथ भोसले या उपस्थित होत्या. सुट्यांमुळे केवळ ७ मुले उपस्थित होती. एका मुलाला बाहेर धूर येताना दिसला, त्याने शिक्षिका भोसले यांना सांगितले. तोपर्यंत जलतरण तलावाच्या बाजूला लागलेली आग बालवाडीच्या वर्गापर्यंत पोहोचली होती. आगीचा लोट अंगणवाडीकडे येताना पाहून सर्व मुलांसह भोसले या ताबडतोब सुरक्षित बाहेर आल्या. दरम्यान, समोर असलेल्या मंगलमूर्ती नागरी सहकारी पतसंस्थेचे संचालक विनायक कुलकर्णी, संदीप कदम व किरण ढमढेरे यांनी मुलांना बाहेर काढण्यास मदत केली. संभाजीनगर मध्ये राहणाऱ्या मल्लेश येणगुल यांनी कात्रज अग्निशामक केंद्राला फोन केला. सातव्या मिनिटात कात्रज अग्निशामक केंद्राचा बंब घटनास्थळी दाखल झाला.पाठोपाठ भवानी पेठ मध्यवर्ती अग्निशामक व कोंढवा अग्निशामक केंद्राच्या गाड्याही घटनास्थळी दाखल झाल्या. कात्रज अग्निशामक केंद्राचे तांडेल जयवंत तळेकर, अनंत जागडे, फायरमन रमेश मांगडे, अमोल तरडेकर, तुषार पवार, तानाजी जाधव तर भवानी पेठ अग्निशामक केंद्रप्रमुख दत्तात्रय नागलकर, तांडेल राजाराम केदारी, फायरमन प्रकाश कांबळे, योगेश चोरघे, शफीक सय्यद, राजू शेलार यांनी आग आटोक्यात आणली. घटना समजताच नगरसेविका साईदिशा राहुल माने, नगरसेवक महेश वाबळे, राजेंद्र शिळीमकर, आबा बागुल यांनी घटनास्थळी भेट दिली. सहकारनगर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक डी. बी. खेडेकर, के. सी. वाळके यांनी ही घटनास्थळाची पहाणी केली.सातव्या मिनिटाला बंब जागेवर पोहोचलेआग लागल्याचा कॉल मिळाल्यानंतर, सातव्या मिनिटात कात्रज अग्निशामक केंद्राची गाडी घटनास्थळी दाखल झाली; परंतु तीनहत्ती चौकाच्या पूर्वेकडील बाजूला जेथे संभाजीनगरच्या चाळी सुरू होतात, तेथून जेमतेम एकच गाडी जाईल एवढाच रस्ता आहे. त्यातच गल्लीत लावलेल्या गाड्यांमुळे घटनास्थळी पोहोचण्यास थोडा उशीर झाला.

आग नक्की लागली कोठून ?अग्निशामक केंद्राची गाडी आग लागल्याच्या ठिकाणी पोहोचेपर्यंत लागलेल्या आगीने रौद्र रूप धारण केलेले असते, सर्वत्र धुराचे लोट निर्माण झालेले असतात. त्यामुळे निश्चित आग कोठून लागली याची पूर्ण शाहनिशा होत नाही ना विद्युतपुरवठा कर्मचाºयांना बोलावण्याची तसदी घेतली जाते. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचे कारण देऊन अग्निशमन केंद्र मोकळे होते.४बिबवेवाडी येथील चिंतामणीनगर भाग १ मधील सिद्धिविनायक इमारतीमधील तिसºया मजल्यावरील संगीता माळी या राहत असलेल्या फ्लॅटला दुपारच्या साडेबाराच्या सुमारास आग लागली. यामध्ये फ्लॅटमधील सर्व सामान जळून खाक झाले. फ्लॅटला आग लागण्याच्या दुर्घटनेच्या वेळी संगीता माळी या नातेवाइकांकडे गेल्या असल्यामुळे घरात कोणीही नव्हते, त्यामुळे सुदैवाने कोणतीही जीविहानी झाली नाही.४ चिंतामणीनगरमधील फ्लॅटला आग लागल्याची घटना सर्व प्रथम शेजारीच असलेल्या अप्पर चाळीतील नागरिकांना लक्षात आली. येथील नागरिकांनी अग्निशमन दलाला व सोसायटीतील इतर नागरिकांना कळविले.४घटनेची माहिती कळताच अग्निशामक दलाच्या कोंढवा खुर्द व बुद्रुक, तसेच मुख्य केंद्रातून असे तीन आगीचे बंब घटनास्थळी दखल होत अग्निशामक दलाचे विभागीय अधिकारी दत्तात्रय नागलकर तांडेल, अजित बेलुसे, रवी बारटक्के, नीलेश राजवडे, हर्षद येवले, अनिकेत गोगावले, संदीप पवार, अजित शिंदे, सुखदेव गोगावले फ्लॅटचा दरवाजा तोडून आत प्रवेश करत फ्लॅट ाधील तीन गॅससिलिंडर बाहेर काढून आग आटोक्यात आणली. संगीता माळी यांच्या घरातील या दुर्घटनेमुळे सर्व साहित्य जाळून खाक झाल्यामुळे मोठा मानसिक धक्का बसला आहे.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडfire brigade puneपुणे अग्निशामक दल