कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी संचारबंदी व्यतिरिक्त इतर कोणतीही उपाययोजना नाही का, असा प्रश्न उपस्थित करत धनकवडी व्यापारी संघटनेने मिनी लाॅकडाऊनला विरोध दर्शविला असून या संदर्भातील निवेदन आमदार भीमराव तापकीर यांना देण्यात आले आहे.
अनलॉकनंतर व्यवसाय पूर्वपदावर येत असतानाच पुन्हा लॉकडाऊन घेतल्याने आमचे नुकसान वाढत चालले आहे. दुकाने बंद असली तरी जागेचे भाडे द्यावे लागत आहे, दुप्पट व्यवसाय कर, नळ नसताना पाणी पट्टी, लाईटबिल तसेच कर्मचा-यांसह स्वत:चा वैयक्तिक खर्च करताना आमचे कंबरडे मोडले आहे, त्यामुळे याविषयी प्रशासनाने पुनर्विचार करावा, अशी मागणी व्यापाऱ्यांनी आमदार तापकीर यांच्याकडे केली आहे.
लॉकडाऊनचा कोणताही निर्णय घेताना किमान महापालिका प्रशासनाने आम्हा व्यापाऱ्यांना तरी विश्वासात घ्यायला हवे, असे मत अध्यक्ष महेश खोपडे यांनी व्यक्त केले. लॉकडाऊनचा परिणाम संपूर्ण बाजारपेठेवर झाला आहे. व्यापाऱ्यांसमोरही अनेक समस्या आहेत. दुकानात काम करणारे अनेक कर्मचारी भीतीने गावी निघून जातात तर जे आहेत त्यांची आर्थिक परिस्थिती खराब आहे. अशा कर्मचारी आणि व्यापा-यांसाठी सरकारने सहकार्य केले पाहिजे. लॉकडाऊन असाच वाढत राहिला तर कोरोनापेक्षा भुकेने मरणाऱ्यांचे प्रमाण वाढेल, अशी भीती संघटनेचे उपाध्यक्ष राजू डांगी यांनी व्यक्त केली.
व्यापारी कोरोना संसर्ग रोखण्यासाठी संपूर्ण सहकार्य करत असतानाच छोट्या छोट्या व नजर चुकीने घडणाऱ्या गोष्टींवर ही प्रशासन कारवाईचा बडगा उगारला जात आहे. मात्र डी-मार्ट आणि स्टार बाजारसारख्या मोठ्या दुकानात, कि जेथे एकाच ????????????
आमदार भीमराव तापकीर म्हणाले, प्रशासन संपूर्ण लाॅकडाऊन लावण्याच्या तयारीत असताना आम्ही विरोध केला. लाॅकडाऊन स्वीकारण्याची नागरिकांची तयारी नसल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले तेव्हा कुठे हे संकट टळली आणि पालकमंत्र्यांनी मिनी लाॅकडाऊन जाहीर केला.