भोर तालुक्तातील हिरडस मावळ खोऱ्यातील धानवली गावचे पुनर्वसन करण्याच्या संदर्भात आमदार संग्राम थोपटे यांनी ग्रामस्थांची भेट घेवून चर्चा केली. त्यावेळी ते बोलत होते.यावेळी जिल्हा परिषद सदस्य विठ्ठलराव आवाळे, आनंद आंबवले, लक्ष्मण पारठे, किसन कंक, विष्णू मळेकर, संजय मळेकर, संतोष साळेकर, सुनील परखांदे, बापू परखांदे, अभिषेक येलगुडे, शिवाजी सासवडे, शिवाजी सणस, बाळासाहेब खोपडे, भगवान खोपडे यांचेसह धानवली गावचे पोलीस पाटील महिपती धानवले, माजी सरपंच आनंदा धानवले, लक्ष्मण धानवले, नागेश धानवले, रमेश धानवले तसेच गावातील तरुण व ग्रामस्थ मंडळी उपस्थित होते.
भोर तालुक्यात पावसाच्या अतिवृष्टीमुळे हिरडस मावळ खोऱ्यातील धानवली गावचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून या गावात धोकादायक परिस्थिती निर्माण झाली असून सर्व ग्रामस्थांनी पुनर्वसनाच्या केलेल्या मागणीनुसार आज प्रत्यक्ष धानवली गावातील नागरिकांचे समवेत बैठक घेऊन धीर दिला.आणी पुढील काळात या गावचे पुनर्वसन करण्यासाठी शासनाकडे विशेष पाठपुरावा करून याच भागात जागा उपलब्ध करून पुनर्वसन करण्याचे आश्वासन दिले.
३१ भोर
धानवली गावच्या भेटीप्रसंगी आमदार संग्राम थोपटे व इतर.