शहरं
Join us  
Trending Stories
1
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
2
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
3
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
4
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
5
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
6
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
7
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
8
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब
9
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
10
"...म्हणून सत्तेतील लोकांची पळापळ सुरू झालीये"; जयंत पाटलांचे महायुतीला पाच सवाल
11
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
12
Kamakhya Temple: पाळीचे ४ दिवस धर्मकार्यासाठी निषिद्ध; कामाख्या मंदिरात त्याच ४ दिवसांचा उत्सव!
13
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
14
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
15
Tripuri Purnima 2024: त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी त्रिपुरी वात जाळा; महादेवाच्या कृपेने दुःख-दैन्य टाळा!
16
NTPC Green Energy चा IPO १९ नोव्हेंबरला खुला होणार, ग्रे मार्केटमध्ये स्थिती काय?
17
...तर दाढी मिशी काढून मतदारसंघात फिरेन; वडिलांच्या आठवणीत मयुरेश वांजळे भावूक
18
"यांना लाज वाटली पाहिजे"; देवेंद्र फडणवीसांचा चढला पारा, विरोधकांना सुनावलं
19
"शिंदे आणि फडणवीस यांना माहीत झाले आहे की..."; ओवेसींचा महायुतीला टोला
20
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट

धर्मगुरु सुधारल्याशिवाय धर्माचे राजकारण थांबणार नाही : डॉ. शबी काझमी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2019 11:59 AM

रझा शाह ट्रस्टच्या माध्यमातून गेल्या ३२ वर्षांपासून मौलाना डॉ. शबी काझमी हिंदू-मुस्लीम ऐक्यासाठी प्रयत्नशील आहेत.

ठळक मुद्दे ‘जगा आणि जगू द्या’ हाच प्रत्येक धर्माचा संदेशदरवर्षी डॉ. काझमी आषाढी वारीमध्ये सुमारे ३०० वारक-यांसाठी निवासाची, भोजनाची व्यवस्था

- पुणेरोटरी क्लब ऑफ शिवाजीनगरच्या वतीने त्यांना नुकतेच शांतता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी ‘लोकमत’ प्रतिनिधीशी संवाद साधताना, काझी यांनी ‘सर्व धर्मगुरु सुधारल्याशिवाय धर्माचे राजकारण थांबणार नाही’, असे मत व्यक्त केले. ‘राजकारणी आणि धर्मगुरु सुधारतील, तेव्हाच शांतता नांदू शकेल, हेही अधोरेखित केले.-------- * सध्या निवडणुकीचा हंगाम आहे. निवडणुकांमध्ये केवळ मतांसाठी जातीय राजकारणावर जोर दिला जातो. याबद्दल काय वाटते?- आपल्या देशातील हे चित्र बदलायला खूप वेळ लागेल. सत्तेचे राजकारण प्रेमावर नव्हे, तर द्वेषावर आधारलेले आहे. एकमेकांचा द्वेष करुन, नावे ठेवून मते मिळवली जातात. प्रत्येक मतदार कोणत्या तरी धर्माचा असतो. धर्मावर त्याची श्रध्दा असते. त्याच्या धर्माबाबतच्या भावना भडकवण्याचा प्रयत्न राजकारण्यांकडून केला जातो. काही अपवाद वगळता, मोठा जमाव राजकारण्यांच्या धार्मिक आवाहनाला बळी पडतो. त्यामुळे मतदान व्यक्तीला नव्हे, त्याच्या धर्माला केल जाते. हे दुष्टचक्र तोडण्यासाठी समाजातील अनेक शांततेचे दूत प्रयत्न करत असतात. शांततेची इमारत उभी करण्याचा प्रयत्न करतात. निवडणुका येतात आणि ही इमारत पत्त्यासारखी कोसळते. जोपर्यंत धर्मगुरु सुधारणार नाहीत, तोपर्यंत जातीवाद मिटणार नाही.

*  इस्लामच्या नावाखाली काही मौैलाना, मौैलवी तरुणांना भडकवण्याचे काम करतात. खरा इस्लाम धर्म काय शिकवण देतो?- कोणालाही भडकावणे सोपे असते, मात्र समजावणे अवघड असते. जिहादच्या नावाखाली चुकीचा इस्लाम धर्म तरुणांसमोर उभा केला जातो. मौैलवींच्या आदेशाचे पालन केल्यास मृत्यूनंतर स्वर्गप्राप्ती होईल, असे सांगितले जाते. चुकीच्या संकल्पना मनावर बिंबवल्या जातात. जोपर्यंत मौैलवी, मौैलाना धर्माचे प्रतिनिधित्व करत असतात. इस्लाम हे प्रेमाचे दुसरे नाव आहे. हजरत मोहम्मद यांनी सांगितले की, आपण रस्त्याने जात असू आणि वाटेत काटे असतील तर ते दूर करणे म्हणजे जिहाद. रस्त्यातील दगडामुळे कोणालाही इजा होऊ नये, म्हणून तो बाजूला करणे म्हणजे जिहाद. अशा पध्दतीचा जिहाद आमच्यासारखे लोक सामान्यांना शिकवणार नाही, तोवर परिस्थिती सुधारणार नाही. मरणे आणि मारणे म्हणजे जिहाद नव्हे.

*  शांततेचा संदेश देणे, परस्परांमध्ये प्रेम आणि विश्वास निर्माण करणे, हेच माझ्या जीवनाचे उद्दिष्ट आहे. हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई या धर्मांच्या पलीकडे जाऊन आपण सर्व माणुसकी जपणारी माणसे आहोत. आपल्यात माणुसकी नसेल, तर आपण कोणत्याही धर्माचे म्हणवून घेण्याच्या पात्रतेचे नाही. एखादा माणूस कोणालाही दुखवून रात्री शांत झोपू शकत असेल तर तो कधीचाच मेलेला आहे. शरीराने तो जिवंत असला तरी मनाने सडलेला आहे. भारतात कोठेही गेल्यावर मी शांततेचा संदेश देण्याचा प्रयत्न करतो. 

टॅग्स :PuneपुणेPoliticsराजकारण