पुणे : सिंहगड रस्त्यावर सणस शाळेजवळ धायरी फाटा येथे होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी महापालिका प्रशासनाने खडकवासला रस्त्याकडे जाणारा उड्डाणपूल बांधण्यात आला. मात्र, त्यामुळे पुलाखालच्या चौकातील वाहतूक कोंडी कमी होण्याऐवजी वाढली. त्यामुळे आता या उड्डाणपुलावरून इंग्रजी वाय आकारात धायरीकडे जाणारा एक छोटा उड्डाणपूल बांधण्याच्या विचारात महापालिका आहे.धायरी गाव, डिएसके विश्व व अन्य काही परिसरात मागील काही वर्षात फार मोठ्या प्रमाणावर लोकसंख्या वाढली आहे. त्यांच्यासाठी आता उड्डाणपुलाखालील चौक कमी पडू लागला आहे. त्यामुळे धायरीकडून येणाऱ्या वाहनांची पुलाखालील चौकात सातत्याने वाहतूक कोंडी होत असते. ती कमी व्हावी म्हणून आता या नव्या उड्डापुलाचा प्रस्ताव शहर सुधारणा समितीपुढे ठेवण्यात आला आहे. त्यावर समितीच्या शुक्रवारी होणाऱ्या बैठकीत या विषयावर चर्चा होणार आहे अशी माहिती समितीचे अध्यक्ष सुशिल मेंगडे व उपाध्यक्ष अजय खेडेकर यांनी दिली. समितीच्या अभिप्रायानंतर हा प्रस्ताव स्थायी समितीकडे विचारार्थ म्हणून पाठवण्यात येईल. स्थानिक नगरसेवकांनी याबाबतचा प्रस्ताव शहर सुधारणा समितीकडे दिला होती. त्यावर समितीने प्रशासनाचा अभिप्राय मागितला होता. प्रशासनाने संबधित ठिकाणाचा तसेच वाहतूकीचा अभ्यास करून अभिप्राय दिला आहे. सणस शाळेकडून धायरीकडे जाणारा रस्ता विकास आराखड्यात २४ मीटर रूंदीचा आहे. प्रत्यक्षात मात्र अनेक व्यावसायिक तसेच विक्रेते यांच्या अतिक्रमणामुळे हा रस्ता फक्त १६ मीटर शिल्लक राहिला आहे. खरी वाहतूक कोंडी त्यामुळे होत आहे. तरीही वाहनांची वाढती संख्या लक्षात घेता सध्या असलेल्या उड्डाणपुलावरूनच वाय आकारात धायरीकडे जाणारा २०० मीटर अंतराचा उड्डाणपूल बांधल्यास बाहेर जाणारी वाहने त्यावरून जाऊ शकतात असा अभिप्राय प्रशासनाने दिला आहे.
धायरीकरांना मिळणार उड्डाणपुलाचा दिलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2018 1:25 PM
धायरी गाव, डिएसके विश्व व अन्य काही गेल्या काही वर्षात फार मोठ्या प्रमाणावर लोकसंख्या वाढली आहे. त्यांच्यासाठी आता उड्डाणपुलाखालील चौक कमी पडू लागला आहे.
ठळक मुद्देशहर सुधारणाचा प्रयत्न : छोट्या उड्डाणपुलाचा प्रस्तावप्रशासनाची २०० मीटर अंतराचा वाय आकाराचा पूल उभारण्यात यावा अशी अभ्यासपूर्ण माहिती