नेरे : भोर तालुक्याच्या दक्षिणेकडील वीसगाव खोऱ्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अधिक गंभीर होत चालला आहे. धोम-बलकवडी धरणाच्या डाव्या कालव्याचे तिसरे आवर्तन दोन दिवसांत सुटले, तर परिसरातील नागरिकांना पाणीप्रश्न भेडसावणार नाही़धोम-बलकवडी धरणाच्या डाव्या कालव्याचे दुसरे आवर्तन बंद होऊन बरेच दिवस झाले आहेत़ यामुळे परिसरातील अनेक विहिरींची पाणीपातळी घटली असून, विहिरींनी तळ गाठला आहे़ वीसगाव खोरे हे भौगोलिकदृष्ट्या उंचवट्यावर व उथळभाग असल्याने पावसाचे पाणी वाहून जाते़ यामुळे उन्हाळ्यात ओढे, नाले, विहिरींना पाणी साठा राहत नाही. परिसरातील ग्रामपंचायतींना नळ पाणीपुरवठा करणाऱ्या अनेक विहिरी या कालव्याच्या पाण्यावर अवलंबून असल्याने व विहिरींनी तळ गाठल्याने तिसऱ्या आवर्तनाची मागणी नागरिकांकडून होत आहे़ या कालव्याचे तिसरे आवर्तन लवकरात लवकर सुटले, तर कालव्याखालील व वरील भागातील नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार नाही. त्यामुळे कालव्याला पाणी सुटण्याची प्रतिक्षा शेतकरी करीत आहे.(वार्ताहर)जनावरांचा पाणीप्रश्न गंभीर उन्हाची तीव्रता, पाणीटंचाई याचा परिणाम या भागातील दुग्धव्यवसाय व अर्थकारणावर मोठ्याप्रमाणावर होत आहे़ वीसगाव खोरे परिसर हा अगोदरच दुष्काळग्रस्त असून, उन्हाळा तीव्र वाढल्याने जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा व नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मोठा गंभीर होत चालला आहे़ यामुळे नागरिक कालव्याच्या आवर्तनाच्या प्रतीक्षेत आहेत.
धोम-बलकवडी कालवा आवर्तनाच्या प्रतीक्षेत
By admin | Published: March 27, 2017 2:06 AM