सुषमा नेहरकर- शिंदे -पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बांधकाम विभागाला दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने मुद्रांक शुल्कात दिलेल्या सवलतीमुळे गेल्या चार महिन्यांत पुणे शहरात दस्त नोंदणीत मोठी वाढ झाली आहे. यात एकट्या डिसेंबर महिन्यात सरासरीच्या दुपट्ट म्हणजे तब्बल 38 हजार 157 दस्त नोंदणी होऊन शासनाला सुमारे 7 कोटी 98 लाखांचा महसूल मिळाला. जानेवारी ते डिसेंबर दरम्यान पुणे शहरात 1 लाख 85 हजार 552 दस्त नोंदणी होऊन त्यातून 33 कोटी 97 लाख ऐवढा महसूल मिळाला आहे.
बांधकाम क्षेत्रातील मंदी आणि त्यात आलेले कोरोनाचे संकट यामुळे संकटात सापडलेल्या बांधकाम क्षेत्राला उभारी देणे व सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्यासाठी शासनाने ऑगस्ट महिन्यात मुद्रांक शुल्कात दोन टप्प्यांत सवलत देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार १ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर या कालावधीत तीन टक्के , तर १ जानेवारी ते ३१ मार्च २०२१ या कालावधीत दोन टक्के सवलत देण्यात आली. त्यात ३१ डिसेंबरपर्यंत ऑनलाईन चालान भरल्यानंतर पुढील चार महिने खरेदी विक्रीच्या व्यवहारात तीन टक्के सवलत मिळणार असल्याचे प्रशासनाने जाहीर केले. यामुळे या सवलतीचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी डिसेंबरच्या शेवटच्या काही दिवसांत दस्त नोंदणीसाठी सर्व दुय्यम निबंधक कार्यालयांत मोठी गर्दी केली. 31 डिसेंबर रोजी रात्री उशीरा पर्यंत कार्यालये सुरू होती --------कोरोना काळात 33 कोटी 97 लाखांचा महसूल राज्यात मार्च महिन्यात आलेल्या कोरोनाच्या संकटामुळे मार्च ते मे हे तीन महिन्ये शहरातील दस्त नोंदणी पूर्ण पणे ठप्प होती. परंतु त्यानंतर शासनान दस्त नोंदणीत दिलेल्या सवलतीमुळे या तीन महिन्याची तुट भरून काढली. यामुळेच डिसेंबर अखेर पर्यंत एकट्या पुणे शहरात 1 लाख 85 हजार 552 दस्त नोंदणी होऊन शासनाला 33 कोटी 97 हजार रुपयांचा महसूल मिळाला. ----गर्दीमुळे कोरोनाचे सर्व नियम धाब्यावर राज्य शासनाने मुद्रांक शुल्कात दिलेल्या सवलतीचा लाभ घेण्यासाठी पुणे शहरातील सर्व दुय्यम निबंधक कार्यालयात डिसेंबरच्या शेवटच्या काही दिवसांत नागरिकांनी प्रचंड गर्दी केली. यावेळी सुरक्षित सामाजिक अंतर राखणे, मास्क, सॅनिटायझेशन सर्व नियम धाब्यावर बसवत ही गर्दी केली. ------नागरिकांनी रात्री उशीरापर्यंत रांगा लावून लाभ घेतला कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बांधकाम विभागाला दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने मुद्रांक शुल्कात दिलेल्या सवलती आणि ३१ डिसेंबरपर्यंत ऑनलाईन चालान भरल्यानंतर पुढील चार महिने खरेदी विक्रीच्या व्यवहारात तीन टक्के सवलतीचा लाभ मिळणार असल्याने नागरिकांनी शेवटची काही दिवस व रात्री उशीरापर्यंत रांगा लावून दस्त नोंदणी केली. यासाठी सुट्टीच्या दिवशी देखील सर्व दुय्यम निबंधक कार्यालय सुरू होती.- अनिल पारखे, मुद्रांक जिल्हाधिकारी ---------जानेवारी ते डिसेंबर दरम्यान झालेली दस्त नोंदणी महिना दस्त नोंदणी जानेवारी 22556फे ब्रुवारी 20269मार्च 13244एप्रिल 0मे 1080जून 8068 जुलै 9543ऑगस्ट 13284 सप्टेंबर 18032ऑक्टोबर 19248नोव्हेंबर 22061डिसेंबर 38157