- श्रीकिशन काळेपुणे - एखाद्या गावात किंवा शहरात बिबट्या आल्याची अफवा पसरते, तेव्हा तिथे बिबट्या आला की नाही, याची खात्री करता येत नाही. आता रेस्क्यू टीमतर्फे 'वाइल्ड लाइफ डिटेक्शन डॉग' तयार केला आहे. हे डॉग केवळ वासावरून एखाद्या वन्यजीवाचा माग काढणार आहेत.
काही वर्षांपासून रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने नेहा पंचमिया या वन्यजीव संवर्धनासाठी काम करत आहेत. अत्याधुनिक साधनांचा वापर करून वन्यजीवांचे प्राण ते वाचवतात. रेस्क्यू टीममधील डॉग एक्स्पर्ट किरण रहाळकर यांनी अशा प्रकारचे डॉग तयार केलेत.
भारतातील पहिलेच युनिटही नवीन संकल्पना आम्ही मांडलीय. वाइल्ड लाइफ डिटेक्शन डॉग' असे त्याला म्हणतात. श्वानांचा वापर प्रामुख्याने गुन्हे शोधण्यासाठी होतो. त्याच पद्धतीने वन्यजीव शोधण्यासाठी श्वानांचा वापर करत आहोत. यानिमित्ताने भारतामधील पहिलेच युनिट आपल्या रेस्क्यूमध्ये आहे. जगभरात दहा वर्षांमध्ये याचा प्रचार झालाय, असेही किरण रहाळकर यांनी सांगितले.
वासावरुन सुगावा- बिबट्या एका शहरात आला आणि तो सापडत नसेल, तर त्याला शोधता येईल. त्यासाठी आम्ही त्याला प्रशिक्षित करतो. दुर्मीळ खवलेमांजर, कासव यांचा सुगावा लावण्यासाठी श्वानांचा वापर होईल.- या श्वानांना दोन वर्षाची ट्रेनिंग देऊन तयार केले जाते. विविध वास देऊन त्यांना प्रशिक्षित केले जाते. संबंधित प्राण्याचा वास त्या श्वानाला दिला की, तो त्याचा माग काढतो.- धुळ्यामध्ये अलीकडेच बिबट्याच्या हल्ल्यात तीन बालकांचा मृत्यू झाला. आम्हाला कळलं की, दुपारी बिबट्या दिसतो. आम्ही डॉग घेऊन गेलो आणि संध्याकाळी बिबट्याला पकडले.