पुणे : मी ससूनमध्ये कोणत्याही पोलिसाला मारहाण केली नाही. तो माझ्या अंगावर पडल्यामुळे मी त्याला बाजूला सारून निघून गेलो, असं उत्तर भाजपचे आमदार सुनील कांबळे यांनी माध्यमांशी बोलताना दिले. ससून रुग्णालयातील कार्यक्रमानंतर स्टेजवरून उतरताना कांबळे यांनी पोलिसाला मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यानंतर त्यांच्यावर अनेकांनी टीका केली होती. विजय वडेट्टीवारांनी ट्विट करून कांबळे यांच्यावर टीका केली होती. यावर बोलताना कांबळेंनी पोलिसाला कानाखाली मारलं नसल्याचे सांगितले.
राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला मी मारहाण केली नाही, त्याला सिव्हिल कपड्यांमध्ये असणाऱ्या पोलिसांनीच मारहाण केल्याचेही कांबळे यांनी सांगितले. कांबळे यांनी मारहाण केल्यानंतर त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
पोलिस कर्मचारी कार्यक्रमाठिकाणी ड्युटीवर असताना कांबळे यांना अचानक राग अनावर झाल्याने त्यांनी कानाखाली मारली. हा सर्व प्रकार ससून रुग्णालय परिसरात घडला. अजित पवार यांचा आज सकाळपासूनच पुण्यात विविध ठिकाणी दौरा सुरू आहे. पुण्यातल्या शासकीय ससून रुग्णालयात देखील विविध वॉर्डच उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले. त्यानिमित्ताने अजित पवार गटाचे कार्यकर्ते देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते.
"आमदार महोदयांनी अरेरावी केली, माझ्या कानाखाली मारली...", राष्ट्रवादीचा (अजित पवार गट) तो नेता लोकमतवर Live