लोकमत न्यूज नेटवर्कबारामती : पदविका अभ्यासक्रमाच्या प्रवेश नोंदणीसाठी दि. ३० जूनपर्यंतची मुदत तंत्र शिक्षण विभागाने दिली असल्याने या मुदतीत विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रिया करणे अवघड आहे. नोंदणी करण्यासाठी मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी असोसिएशन आॅफ द मॅनेजमेंट आॅफ अनइडेड इन्स्टिट्यूट इन रूरल एरिया या राज्यातील ग्रामीण भागातील शिक्षण संस्था चालकांच्या संघटनेच्या वतीने तंत्र शिक्षण संचालकांना देण्यात आले आहे.याबाबत असोसिएशनचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ म्हणाले, अभियांत्रिकीच्या प्रथम वर्ष पदविकेची प्रवेश प्रक्रिया नुकतीच सुरू झाली आहे. या प्रवेश प्रक्रियेसाठी १० वीचे मूळ गुणपत्रकासह इतर कागदपत्रे अत्यावश्यक आहे. वास्तविक पाहता १० वी परीक्षेचा आॅनलाईन निकाल जाहीर झाला आहे. मात्र, निकालाच्या गुणपत्रिकेची मूळ प्रत दि. २४ जून रोजी दिले गेले. मात्र, दि. २५ रोजी रविवार तर सोमवार दि. २६ रोजी रमजान ईदची सुट्टी होती. त्यामुळे या विद्यार्थ्यांना शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र २७ जून नंतरच वितरिक होणार आहे. शाळा सोडल्याच्या प्रमाणपत्रासह तहसील कार्यालयातून जात प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र, रहिवासी दाखला, अधिवासी प्रमाणपत्र, राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला इर्त्यादी कागदपत्रे विद्यार्थ्यांना एवढ्या कमी वेळेत उपलब्ध होणे अशक्य आहे.
अभियांत्रिकी प्रवेशप्रक्रिया मुदतीत करणे अवघड
By admin | Published: June 28, 2017 4:00 AM