पुणे : गेल्या काही महिन्यांपासून राज्य शासनाच्या महसूल विभागातर्फे राज्यातील शेतकऱ्यांना डिजिटल सात-बारा उतारे देण्यासाठी विशेष मोहीम राबविली जात आहे. मात्र, कोकण विभाग त्यात मागे असून पुणे विभागतही काही जिल्ह्यांचे काम संथ गतीने सुरू आहे. परंतु, येत्या आॅगस्ट महिन्यापर्यंत सर्व शेतकºयांना आॅनलाईन पद्धतीने उतारे मिळावेत यासाठी युद्धपातळीवर काम केले जात आहे. आतापर्यंत ८ लाख ७० हजार डिजिटल सात-बारा उताºयांचे काम पूर्ण झाले आहे.सात-बारा उतारा मिळविण्यासाठी शेतकºयांना तलाठी कार्यालयात जावे लागत होते. मात्र, शेतकºयांना आॅनलाईन पद्धतीने सात-बारा उतारा देण्याची मोहीम हाती घेण्यात आली. त्यासाठी प्रत्येक गावनिहाय शेतकºयांच्या सात-बारा उताºयांचे संगणकीकरण करण्यात आली. त्यात आवश्यक दुरुस्त्या करून शेतकºयांसमोर चावडीवाचन करण्यात आले. आता शेतकºयांना डिजिटल स्वाक्षरीने सात-बारा उतारा देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. राज्य शासनातर्फे १ मे रोजी त्यासाठी जाहीर कार्यक्रम घेण्यात आला. मात्र, अजूनही अनेक जिल्ह्यांचे काम खूप मागे आहे.रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतजमीनविषयक न्यायालयात सुनावणी सुरू असल्याने या जिल्ह्यांचे काम थांबले आहे. तसेच सुमारे ४ हजार गावांमधील सात-बारा उताºयामधील दुरुस्तीची कामे सुरू आहेत.ई-फेरफार प्रकल्पाचे राज्य सन्वयक रामदास जगताप म्हणाले, राज्यातील ८ लाख ७० हजार डिजिटल सातबारा उताºयांचे काम पूर्ण झाले आहे. मात्र, येत्या आॅगस्ट महिन्यापर्यंत अडीच कोटी उताºयांचे काम पूर्ण करायचे आहे. त्यासाठी नियोजनबद्ध कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे.कोकण विभागात सातबारा उताºयांची संख्या जास्त असून सर्व्हरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने कोकण विभागाचे काम मागे राहिले आहे. पुणे विभागात ६८ हजार, नागपूर विभागात ५९ हजार २५३, नाशिक विभागात ११ लाख ८ हजार ४८२, औरंगाबाद विभागात ३ लाख ५७ हजार १९, अमरावती विभागात २,१८,७७०, तर कोकण विभागात ३१ हजार ७०२ डिजिटल सातबारा उताºयाचे काम पूर्ण झाले आहे.जिल्हानिहाय डिजिटल सात-बारा उताºयाची माहितीपुणे -१०,८३६ , सोलापूर -४०,०२२, सातारा-४५०, सांगली-१७,१८१, कोल्हापूर-११,१०५, नागपूर-७, ८००, भंडारा-२०,११२, गोंदिया-१३,७१५, गडचिरोली-१,२८६, चंद्रपूर-२,२१८,वर्धा-१४,०७१, नंदूरबार-८,२४८, अहमदनगर-१,००,३७०,जळगाव-९,८६४, नाशिक ५,६९०, औरंगाबाद-१,३८३, नांदेड-३५,३९६, हिंगोली-२८,७३२, परभणी-१३,१०३, जालना-१,०९, ५९६, बीड-१,१०२,लातूर-११,६८७ , उस्मानाबाद-१,५६,०२०, रायगड-२९,८६८, पालघर-१,८३२, ठाणे-१४२, अमरावती-२२, ३१२, यवतमाळ-५२,०१५, बुलढाणा-७३,०५८, अकोला-६१,१४५
डिजिटल सात-बारामध्ये ‘कोकण’ मागेच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 03, 2018 6:19 AM