पुणे शहर अनेक जागतिक दिग्गजांच्या जीवनातील एक हिस्सा आणि जीवन प्रवाहातील महत्त्वाच घटक आहे.
देवानंद, दिलीप कुमार, व्ही. शांताराम, गुरुदत्त, जया भादुरी, डॅनी, शत्रुघ्न सिन्हा, सुभाष घई यादी खूप आहे.
पुण्यातील रेसिडेन्सी क्लबतर्फे दर वर्षी ‘प्राईड ऑफ पुणे’ पुरस्कार दिला जातो.
अशाच एका समारंभास नाना चुडासामा, दिलीप कुमार, सायरा बानो आले होते. तेव्हा मला त्यांची भेट मिळाली होती. मी नेहमी दिग्गज व्यक्तिमत्त्वांना पुणे शहराविषयी बोलते करतो. दिलीप कुमारही त्याला अपवाद नव्हते. माझ्या पुणे वृत्तदर्शनला त्यांनी मोजक्या मराठी शब्दांत मुलाखत दिली होती. त्यांना मी विचारले होते. “पुणे शहराविषयीचं तुमचं काय मत आहे?” तेव्हा ते थोडे भावनावश झाले. २ मिनिटे काहीच बोलले नाहीत, मला वाटलं आपण काही चुकीचं तर विचारलं नाही ना? पण तसं काहीच नव्हतं. दोन मिनिटांच्या शांततेनंतर कपाळावर दिलीप कुमार स्टाईल हाथ व कपाळ, डोळे यावर आठ्या पाडून म्हणाले, ‘इस पूना सिटीने मुझे जिंदगी मे पहले सौ रुपये कमाने का मौका दिया.’ माझ्या चेहऱ्यावरचे प्रश्नार्थ भाव पाहून म्हणाले, ‘बेटा सुनो, आपका जन्म नही हुआ था. १९४० मे मैने पुणे कॅम्प में आर्मी के कॅन्टीन के बाहर सॅन्डविच का स्टॅाल लगाया था. पिताजीसे झगडा करके पूना आया था. राज कपूर मेरा बचपन का साथी है. वो जब भी पूना आता मुझे मिलने स्टॅाल पर जरूर आता था. पूना के प्यारे लोग, शहर की हवा, खुला आस्मान, खडकवासला डॅम, बंडगार्डन, मेन स्ट्रीट, शहर की सभ्यता, शिक्षा, और संस्कृत का शहर ओर सायकल मुझे बोहोत पसंद है.
आर्मी कॅन्टीन सॅन्डविच स्टॅाल करून मी पाच हजाराची बचत केली आणि मुंबईला परत गेलो.
त्या कॅन्टीनमधून मी जेव्हा पहिल्या १०० रुपयाचे सेव्हिंग केले. तो दिवस माझ्या कायम स्मरणात आहे. कारण तो दिवस पुण्यातला होता, मला आयुष्यात स्व कमाईचा आनंद याच पुणे शहराने दिला आहे! मी आवाक झालो, एखाद्या व्यक्तीला आपण आपल्या शहराविषयीच्या भावना विचारल्यावर, बोलते केल्यास खूप मोठा माहितीचा खजिना सापडतो!
दिलीप कुमार यांना विनम्र आदरांजली!
डॅा. शैलेश गुजर