पुणे : भारतीय चित्रपटसृष्टीमध्ये अजरामर ठरलेला चित्रपट म्हणजे ’मुघले ए आझम’. दिलीपकुमार यांचा नैसर्गिक अभिनय आणि मधुबालाचे आरसपानी सौंदर्य यामुळे आजही हा चित्रपट रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. पण ऐकून कदाचित आश्चर्य वाटेल! हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर तब्बल 18 वर्षांनी दिलीपकुमार यांनी एफटीआयआयच्या मेन थिएटरमध्ये पहिल्यांदा मुघले ए आझम हा चित्रपट पाहिला होता. 1978 साली दिलीपकुमार यांनी एनएफएआयचे पहिले संचालक पी.के नायर यांच्याकडे १५ अभिजात कलाकृती पाहण्याची इच्छा प्रदर्शित केली. त्यांची पत्नी सायरा बानू यांनी या १५ चित्रपटांची निवड केली.
हिंदी चित्रपट सृष्टीतील ट्रॅजिडी किंग दिग्गज अभिनेते मोहमद दिलीपकुमार यांचं सृष्टीतील बुधवारी (दि.७) निधन झालं आहे. ते ९८ वर्षांचे होते. दिलीप कुमार यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने, मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. उपचारादरम्यानचे आज पहाटे त्यांना अखेरचा श्वास घेतला.
पुढील १५ दिवस त्यांनी या कलाकृतींचा आस्वाद घेतला. ’मुघले ए आझम’ हा चित्रपट त्यांनी पत्नीसमवेत पाहिला. याशिवाय एफटीआयआयच्या १४ डिसेंबर १९७७ मध्ये झालेल्या पदवी प्रदान समारंभाला देखील दिलीपकुमार उपस्थित होते. एफटीआयआयकडे दिलीपकुमार यांच्याशी निगडित अविस्मरणीय आठवणी आहेत. त्यांनी पदवी प्रदान समारंभाचे अध्यक्षपद भूषविल्याबददल आम्ही त्यांचे कायमस्वरूपी ॠणी आहोत, अशी भावना एफटीआयआयचे संचालक भूपेंद्र कँथोला यांनी व्यक्त केली.
पिफच्या पहिल्या जीवनगौरव पुरस्काराचे दिलीपकुमार मानकरी पुणे आंतराराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये २००२ (पिफ) दिलीपकुमार यांना पहिला जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला होता. तेव्हा त्यांनी मराठी आणि इंग्रजीमध्ये संवाद साधून रसिकांची मने जिंकली होती.-------------------------------------------------------