शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
2
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
3
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
4
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
5
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
6
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
7
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
8
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
9
OLA चा धमाका! लॉन्च केली नवीन EV स्कूटर रेंज; किंमत फक्त ₹39,999 पासून सुरू...
10
लोकप्रिय म्युझिक बँडच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये प्रिया बापटचा परफॉर्मन्स, अनुभव शेअर करत म्हणाली...
11
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
12
"३० नोव्हेंबरपर्यंत मुख्यमंत्रीपदाचे नाव निश्चित होईल"; रावसाहेब दानवेंनी सांगितला फॉर्म्युला
13
"उद्धव ठाकरेंची अवस्था शोलेमधील असरानीसारखी’’, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका 
14
राखी सावंतने केली Bigg Boss विजेत्याची भविष्यवाणी; म्हणाली, "नाही जिंकला तर पंख्याला लटकेन..."
15
स्टार ऑलराउंडर ठरला महागडा! ३ चेंडूत दिल्या ३० धावा; नेटकऱ्यांनी केला फिक्सिंगचा आरोप
16
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था
17
राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक अधिसूचना जारी; २० डिसेंबरला होणार मतदान
18
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
19
'इंडिया आघाडीला मजबूत नेत्याची गरज', TMC ने राहुल गांधींच्या क्षमतेवर उपस्थित केला प्रश्न
20
'ते फोन उचलत नव्हते, म्हणून कान उघडले...', लॉरेन्स टोळीने चंदीगड बॉम्बस्फोटाची जबाबदारी घेतली, रॅपर बादशाहला दिली धमकी

Diljit Dosanjh : कोथरुडकरांचा विरोध झुगारून पोलिस बंदोबस्तात ‘दिलजीत कॉन्सर्ट’

By दीपक होमकर | Published: November 25, 2024 8:38 PM

कोथरुड : कोथरुड येथील काकडे फार्म्समध्ये पंजाबी गायक रविवारी दिलजीत दोसांज यांचा कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमात मद्यविक्री होणार होती, ...

कोथरुड : कोथरुड येथील काकडे फार्म्समध्ये पंजाबी गायक रविवारी दिलजीत दोसांज यांचा कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमात मद्यविक्री होणार होती, तसेच कार्यक्रमामध्ये येणाऱ्या तरुण, तरुणींच्या गर्दीमुळे परिसरात मोठी वाहतूककोंडी होईल या कारणाने कार्यक्रमाला कोथरुडकांनी विरोध करत आंदोलन केले होते. त्याची दखल घेत मंत्री आणि नवनिर्वाचित आमदार चंद्रकांत पाटील यांनीही कार्यक्रम रद्द करावे अशी सूचना पोलिस आयुक्तांना दिली असल्याची माहिती माध्यमांना दिली होती. मात्र तरीही रविवारी दिलजीत यांचा कार्यक्रम पोलिसांच्या बंदोबस्तात यशस्वी पार पडला.याबाबत माहिती अशी की, कोथरुड येथील काकडे फार्म्स येथे ‘दलजीत सिंग कॉन्सर्ट’ कार्यक्रमाला कोथरुडसह राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेकडून विरोध केला होता. रविवारी दुपारी याबाबत आंदोलन करण्यात आले होते. शिक्षक नगर, शिवतीर्थ नगर, कांचनबन सोसायटी, सीमा गार्डन, यासह अन्य सोसायट्यांना याचा त्रास होत असतानादेखील हा कार्यक्रम येथे घेण्यात येत आहे अशी तक्रार सोसायटीतील रहिवाशांनी केली होती. मात्र तरीदेखील हा कार्यक्रम पोलिसांच्या बंदोबस्तात रात्री झाला. रात्री साडेदहापर्यंत हा कार्यक्रम सुरू होता.पुण्यामुंबईसह इतर राज्यातील प्रेक्षकही या कार्यक्रमात सहभागी झाले होते. तेव्हा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी कार्यक्रमात प्रवेश केला आणि तेथील मद्यपान केलेल्या तरुण-तरुणींनी मद्यपान केल्याचे आरोप केले. त्यांच्याकडून दारूच्या बाटल्याही ताब्यात घेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवकांनी ठिय्या आंदोलन केले. सायंकाळी सातच्या सुमारास आंदोलन केेले. मात्र कार्यक्रम सुरूच राहिला.कार्यक्रमात गोंधळ होऊ नये यासाठी पोलिसांनी मोठा बंदोबस्त लावला होता. आंदोलन झाल्यावरही आणि कोथरुडकरांचा, मंत्र्यांचा विरोध असतानाही पोलिसांकडून कार्यक्रम रद्द का केला गेला नाही आणि पोलिसांनी त्यांना संरक्षण देऊन कार्यक्रम होऊ का दिला असा प्रश्न संघटनेच्या कार्यकर्त्यांना विचारला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस कोथरुड विधानसभा अध्यक्ष हर्षवर्धन मानकर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी संघटना अध्यक्ष विजय बाबर, शुभम माताळे, आशिष शिंदे, लखन सौदागर, अरविंद वालेकर, रोहिदास जोरी, प्रकाश नलावडे, मोहित बराटे, संतोष शर्मा, सुरज, गायकवाड लखन, तोंडे कृष्णा लिंगे, केदार सनस आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :PuneपुणेDiljit Dosanjhदिलजीत दोसांझkothrudकोथरूडchandrakant patilचंद्रकांत पाटील