शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
2
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
3
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
4
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
5
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
6
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
7
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
8
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
9
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
11
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"
12
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
13
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
14
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण
15
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
17
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
18
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
19
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
20
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?

धरणे यंदा १० टक्के अधिक भरली , जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला

By admin | Published: July 23, 2015 4:52 AM

भोर तालुक्यात मागील दोन दिवसांपासून सुरू झालेल्या पावसामुळे रखडलेल्या भाताच्या लावण्या सुरू झाल्या आहेत. लागवड झालेल्या भातासह

भोर : भोर तालुक्यात मागील दोन दिवसांपासून सुरू झालेल्या पावसामुळे रखडलेल्या भाताच्या लावण्या सुरू झाल्या आहेत. लागवड झालेल्या भातासह इतर पिकांनाही याचा फायदा होणार असल्याने बळीराजा सुखावला आहे. धरणातील पाणीसाठ्यात वाढ झाली असून, भाटघर धरण ४१ टक्के, तर नीरा देवघर धरण ३४ टक्के भरले आहे. जून महिन्यात सरासरीच्या १५० टक्के पाऊस झाल्याने गतवर्षीच्या तुलनेत दोन्ही धरणे या वेळी १० टक्के अधिक भरली आहेत.मागील १५ दिवसांपासून पावसाने दांडी मारल्याने भोर शहराजवळच्या व पूर्व भागातील भाताच्या लावण्या रखडल्या होत्या. मात्र, दोन दिवसांपासून संपूर्ण भोर तालुक्यात पडत असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची चिंता दूर झाली आहे. रखडलेली लागवड पुन्हा सुरु झाली आहे. यामुळे बळीराजा सुखावला असून, शेतीच्या कामाला वेग आला आहे. शेतकरी कामात व्यस्त असल्याने कामाला मजूर मिळत नाही.दरम्यान, भाटघर धरणात मागच्या वर्षी २६ टक्के पाणीसाठा, तर नीरा देवघर धरणात २२ टक्के पाणीसाठा होता. मागच्या वर्षीच्या तुलनेत या वेळी भाटघर धरणभागात आज ३० मिलिमीटर तर एकूण ३५६ मि.मी पाऊस झाला. धरण ४१ टक्के भरले आहे. नीरा देवघर खोऱ्यात आज ६४ मि.मी तर एकूण ७८८ मिलिमीटर पाऊस झाला असून, धरण ३४ टक्के भरले आहे. वीर धरण २२ टक्के भरले आहे. पावसाअभावी भोर तालुक्याच्या पश्चिम भागातील नीरा देवघर व भाटघर धरणभागातील डोंगरदऱ्यातून वाहणारे झरे व ओढे नाले बंद झाले होते. मात्र, पावसामुळे ओढेनाले पुन्हा भरून वाहू लागले आहेत. यामुळे या भागातील वरंधघाट परिसरात पुन्हा पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे.पौड : महिनाभराच्या प्रतीक्षेनंतर पावसाचे मुळशीत दमदार आगमन झाले आहे. मुळशी धरण परिसरात पावसाचा जोर आता चांगलाच वाढला आहे. मागील दोन दिवसांत या परिसरात २६० मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. भातरोपे व भातलागवडीकरिता हा पाऊस योग्य असला तरी धरणांचा साठा वेगाने वाढण्याच्या दृष्टीने हा पाऊस अत्यल्पच आहे.सध्या मुळशी व टेमघर धरणाच्या साठ्यात हळूहळू वाढ होत आहे. या भागातील धरणे पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी किमान एकूण ३००० मिमी पाऊस पडणे आवश्यक असतो. तहसील विभागाकडून प्राप्त झालेल्या आकडेवारीनुसार, जून व जुलै अशा दोन महिन्यांतील पावसाची आतापर्यंतची मुळशी तालुक्याची एकूण सरासरी (१ जून ते २१ जुलै) १२२१ मि.मि. एवढी आहे.(वार्ताहर)