गराडे: गेल्या पाच वर्षांत दिवे ग्रामपंचायतीने मोठ्या प्रमाणावर विकासकामे केली. तसेच, वैयक्तिक लाभाच्या योजना गोरगरीब लोकांपर्यंत पोहोचविल्या. या गोरगरीब जनतेचे आशीर्वाद आमच्या मागे राहिल्यामुळे श्रीनाथ ग्राम विकास आघाडीचे १५ पैकी ११ उमेदवार विजयी झाले. ही श्री कातोबा नाथांची कृपा होय, असे उद्गार भाजपचे युवा नेते बाबाराजे जाधवराव यांनी काढले.
दिवे (ता. पुरंदर) येथे ग्रामपंचायतीचा निकाल झाल्यानंतर श्री कातोबा मंदिरात विजयी उमेदवारांनी नाथांचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांचे औक्षण करून स्वागत करण्यात आले. यानंतर झालेल्या विजयीसभेत बाबाराजे होते.
या वेळी गणपत शितकल, ॲड. बाजीराव झेंडे, नामदेव टिळेकर, दिनकर गायकवाड, बापूसाहेब राऊत, बापूसाहेब टिळेकर, दत्ता राऊत आदीसह दिवे पंचक्रोशीतील मान्यवर पदाधिकारी,ग्रामस्थ उपस्थित होते.
गावपण टिकविण्यासाठी माजी मंत्री दादा जाधवराव व आमदार संजय जगताप यांच्या नेतृत्वात नेतृत्वाखाली सर्व लोक एकत्र आले. त्यामुळे हा मोठा विजय प्राप्त झाला. गुलाल व भंडारा उधळत ग्रामस्थांनी गावात विजयी उमेदवारांचे स्वागत केले. या पुढे ही विजयाची परंपरा सातत्याने राखली जाईल, असे बाबाराजे जाधवराव यांनी सांगितले.
सूत्रसंचालन गणपत शितकल यांनी केले, तर आभार दिनकर गायकवाड यांनी मानले.
विजयी उमेदवार पुढील प्रमाणे: भारती घाडगे, शोभा लडकत, श्रद्धा काळे, सुजाता जगदाळे, योगेश काळे, अमित झेंडे, सुमन टिळेकर, शोभा टिळेकर, गुलाब झेंडे, शोभा झेंडे व रुपेश राऊत.
२१गराडे दिवे
दिवे (ता. पुरंदर ) येथे विजयी उमेदवारांच्या समवेत बाबाराजे जाधवराव