पुणे : ज्योतिष हे शास्त्र आहे, त्याचा उपयोग समाजाला दिशा देण्यासाठी होऊ शकतो, असे मत उद्योगपती अशोेक चोरडिया यांनी व्यक्त केले.बृहन्महाराष्ट्र ज्योतिष मंडळाचे सदस्य व्यावसायिक जगन्नाथ ऊर्फ बाबासाहेब कुलकर्णी यांना ७५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने अशोक चोरडिया यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला़ मंडळातर्फे आयोजित भविष्य कथन अभ्यास शिबिराच्या समारोपप्रसंगी चोरडिया बोलत होते़ प्रसिद्ध गायिका मंजुश्री ओक प्रमुख पाहुण्या म्हूणन उपस्थित होत्या़चोरडिया म्हणाले, की व्यवसायाच्या मार्गदर्शनासाठी शुभ व अशुभ दिवसांचा उपयोग होऊ शकतो़ त्याप्रमाणे प्रयत्न केल्यास यश मिळू शकते, असा माझा अनुभव आहे़ बाबासाहेब कुलकर्णी म्हणाले, मला ज्योतिषशास्त्राचा खूप उपयोग झाला. हे शास्त्र सकारात्मकरीत्या वापरल्यास समाजाला खूपच उपयुक्त ठरेल.या शिबिरात ५० अभ्यासकांनी भाग घेतला़ त्यांना प्रमाणपत्रे देण्यात आली़ अॅड़ मालती शर्मा यांनी सूत्रसंचालन केले़
आज ज्योतिषशास्त्राची आवश्यकता का आहे़ तसेच विद्यार्थ्यांना विवाह योग ते आयुष्य योग कसा पाहावा, याचे नियम आहेत़ ग्रह, साडेसाती, मंगळयोग, कालसर्पयोग, नक्षत्र शांती या गोष्टी कालबाह्य करून या शास्त्राची कर्मकांडातून मुक्तता झाल्यास या शास्त्राचा विकास होऊन समाजाला मार्गदर्शक शास्त्र म्हणून पुढे येईल़- नंदकुमार जकातदार प्रास्ताविकात, मंडळाचे अध्यक्ष