राडारोड्यामुळे आम्ही चालायचं कसं, असा सवाल येथील पादचारी व नागरिक करीत आहे. तरी येथील राडारोड्यांची स्वच्छता करण्याची मागणी होत आहे.
मुंढवा परिसरात गेल्या आठ-दहा वर्षांत रस्तारुंदीकरणाची कामे पूर्ण झाली. भलेमोठे रस्ते झाले व त्याबरोबर नागरिकांनी पायी जाण्यासाठी पदपथाची निर्मितीही करण्यात आली. मुंढवा मुळा-मुठा नदीवरील जुना पूल काही
वर्षांपूर्वी दुरुस्त करण्यात आला. नवीन पदपथ तयार करण्यात आले. परंतु मुंढव्याच्या दिशेने येणारे पदपथ अतिशय धोकादायक झालेले आहेत. येथील पदपथाच्याजवळ मोठ्या प्रमाणात राडरोडा टाकलेला आहे आणि अशातच येथील
पदपथांवर नागरिक कचरा टाकत आहेत. यामुळे येथे घाणीचे साम्राज्य झाले आहे. अगोदरच कोरोनाच्या महामारीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात असताना त्यात भररस्त्यावर कचऱ्याचे मोठे साम्राज्य होणे आरोग्यदृष्ट्या योग्य नाही. तरी
येथील कचरा व राडारोडा त्वरित उचलावा अशी मागणी येथील नागरिक करीत आहेत.
फोटो ओळः मुंढवा येथील मुळा-मुठा नदी जुना पुलावरील पदपथाच्या जवळ कचरा व राडारोडा पडल्याने नागरिकांना पायी चालणे जिकिरीचे झाले आहे.