युगंधर ताजणे- पुणे : अपघातानंतर रुग्णालयात दाखल केल्यानंतर तेथील चुकीच्या उपचाराने अपंगत्व आले. ज्या डॉक्टरांमुळे पुढील आयुष्यभर अपंगत्व सोबत घेऊन जगावे लागणार आहे, त्यांच्याबद्दल पोलिसांकडे तक्रार करुन पदरी अपयश आले. तब्बल नऊ वर्षांनी पोलिसांनी त्या तक्रारीची दखल घेऊन शेवटी जबाव नोंदवून घेतला. मात्र जबाब घेऊन दोन वर्षे उलटून गेली असतानादेखील अद्याप तपासातील प्रगती शंकास्पद आहे. अशीच वेळ जर एखाद्या मंत्र्यांच्या मुलांवर किंवा नात्यावर आली असती तर पोलिसांनी कारवाई करताना अशीच दिरंगाई केली असती का? असा प्रश्न प्रकाश परदेशी यांच्यावर पोलिसांकडून झालेल्या तक्रार नोंदणीच्या निष्काळजीपणाबाबत उपस्थित झाला आहे. फिर्यादी परदेशी (वय ६३, रा. मार्केटयार्ड रस्ता) यांचा १७ मे २००६ रोजी दुपारी अडीचला बंडगार्डन वाहतूक विभाग येथे अपघात झाला. यात त्यांच्या रिक्षाला एका चारचाकी वाहनाने जोरदार धडक दिली. जखमी झाल्यानंतर त्यांना रुबी रुग्णलयात दाखल केले. त्या वेळी त्यांच्यावर उपचार करणाºया डॉ. जयंत शहा यांनी डाव्या पायाच्या खुब्याचा व गुडघ्याचा एक्सरे काढण्यास सांगितले. एक्सरे काढल्यानंतर ‘तुम्हाला कुठेही फ्रॅक्चर झालेले दिसत नाही. तुम्ही दोन ते तीन महिने घरी आराम करा. आराम केल्यानंतर तुम्हाला बरे वाटेल.’ असे डॉक्टरांनी सांगितले. मात्र परदेशी यांनी पायाला वेदना होत असल्याचे सांगितल्यानंतर डॉक्टरांनी वेदनाशामक इंजेक्शन देऊन तुम्हाला कुठेही फ्रॅक्चर झाले नसल्याचे सांगून डिस्चार्ज दिला. दुखणे वाढल्यानंतर परदेशी यांनी त्यांच्या ओळखीच्या डॉ. केरीग यांच्याकडे तपासणी केल्यानंतर परदेशी यांना डाव्या पायाच्या खुब्यात फॅ्रक्चर असल्याचे सांगून शस्त्रक्रियेचा सल्ला दिला.................पुन्हा एकदा पोलिसांकडे अर्ज केलाडॉक्टरांच्या चुकीचा रिपोर्ट दिल्याची खात्री झाल्यानंतर त्याच्या झालेल्या त्रासाबद्दल परदेशी यांनी सुरुवातीला ११ आॅगस्ट २००९ रोजी एक खिडकी योजनेद्वारे पोलिसांकडे तक्रार केली. त्याला कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही. यानंतर ३१ मार्च २०१६ रोजी पुन्हा एकदा पोलिसांकडे अर्ज केला. त्याचा सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर तत्कालीन पोलीस अधिकारी यांनी तपासाचे आदेश दिल्यानंतर १२ एप्रिल २०१७ मध्ये कोरेगाव पार्क पोलिसांनी त्यांचा जबाब नोंदवून घेतला आहे. ......पोलीस गोरगरिबांचा विचार करीत नाही. ते फक्त श्रीमंतांचा विचार करतात की काय असा प्रश्न आतापर्यंतच्या त्यांच्या कार्यपद्धतीकडे पाहून पडला आहे. आपल्या कामातून गरिबांना न्याय मिळावा अशी त्यांची मानसिकता दिसत नाही. याउलट गरिब दिसला की त्याची अनेक प्रकारे मुस्कटदाबी केली जाते. चुकीच्या उपचारामुळे अपंगत्व आले त्याचा फटका सहन करावा लागला. त्याविरोधात पोलीस प्रशासनाकडे दाद मागितली तर त्यांनी नऊ वर्षांहून अधिक काळ टोलवाटोलवी केली. या सगळ्या प्रकाराने प्रचंड प्रमाणात मानसिक व शारीरिक हानी सोसावी लागली आहे- प्रकाश बाबूलाल ऊर्फ सोहनलाल परदेशी, तक्रारदार-पीडित
डॉक्टरांच्या चुकीच्या उपचारामुळे अपंगत्व ; नऊ वर्षांनी पोलिसांनी घेतला जबाब
By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2019 11:39 AM
अशीच वेळ जर एखाद्या मंत्र्यांच्या मुलांवर किंवा नात्यावर आली असती तर पोलिसांनी कारवाई करताना अशीच दिरंगाई केली असती का?
ठळक मुद्देनऊ वर्षांनी पोलिसांनी घेतला जबाब : तपासातील प्रगती शंकास्पद असल्याचा आरोप