येथील सांस्कृतिक भवनामध्ये झालेल्या या लसीकरण उपक्रमाची सुरुवात हेंकेल इंडिया कंपनीचे कार्पोरेट मॅनेजर भूपेश सिंग व संध्या केडलिया यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी पुरंदर पंचायत समितीच्या सभापती नलिनी लोळे, नगराध्यक्ष वीणा सोनवणे, श्री ज्ञानयोग सेवा ट्रस्टचे डॉ.राजेंद्र खेडेकर, रवींद्र ननावरे, श्री विकास माने,जेजुरी आरोग्य सेवा संघाचे डॉ. नितीन केंजळे, डॉ.शमा केंजळे, प्रकाश खाडे, विठ्ठल सोनवणे आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना श्री भूपेश सिंह यांनी गेली दोन वर्षे कोणाशी लढताना देशातील सर्व डॉक्टर्स व आरोग्य कर्मचाऱ्यांनी देवदूत म्हणून काम केले आहे. या सर्वांचा आपणाला अभिमान आहे. या काळात ऑक्सिजनअभावी अनेक रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले. नैसर्गिक ऑक्सिजन निर्मितीसाठी प्रत्येकाने किमान दहा झाडे लावावीत.
कंपनीच्या माधुरी काकडे, अतिक मुंशी, हर्षद झगडे, जितेंद्र पाटील, उदय नवले यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले होते. प्रास्ताविक डॉ. प्रसाद खंडागळे यांनी केले. सूत्रसंचालन नितीन राऊत यांनी केले. माधुरी काकडे यांनी आभार मानले.
--
फोटो क्रमांक : ०८जेजूरी दिव्यांग लसीकरण
फोटो ओळी : जेजुरी येथे दिव्यांगांच्या लसीकरण कार्यक्रमात बोलताना भुपेश सिंग.
080921\img_20210906_120105.jpg
दिव्यांग व लोककलावंतांना मार्गदर्शन करताना हेंकल इंडियाचे व्यवस्थापक भुपेश सिंग