शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
2
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
3
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
4
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
5
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
6
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
7
डायलॉग, टाळ्या, शिट्ट्या आणि पैसा वसूल! कसा आहे शरद केळकरचा ‘रानटी’? वाचा Review
8
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
9
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
10
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...
11
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
12
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
13
जिओची धमाकेदार ऑफर, 50 दिवसांपर्यंत मिळेल सुपरफास्ट इंटरनेट!
14
Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."
15
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
16
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."
17
"बिहार खड्ड्यात गेलाय’’, पोटनिवडणुकीतील पराभवानंतर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया 
18
पेन्शनधारकांनो, नो टेन्शन; हयातीचा दाखला मिळणार घरपोच!
19
IND vs AUS :आम्ही दबावात होतो; पण... बुमराहनं शेअर कमबॅक मागची स्टोरी
20
IPL Auction 2025: "थोडे जास्तच पैसे गेले, आम्ही रिषभ पंतसाठी..."; LSGच्या मालकांनी सांगितला 'फसलेला' प्लॅन

वैद्यकीय सेवा बंद राहिल्याने गैरसोय

By admin | Published: March 24, 2017 4:28 AM

डॉक्टरांवर होणाऱ्या हल्ल्याच्या निषेधार्थ ससूनमधील निवासी डॉक्टरांचा सामूहिक रजेचा निर्णय कायम राहिला. इंडियन मेडिकल

पुणे : डॉक्टरांवर होणाऱ्या हल्ल्याच्या निषेधार्थ ससूनमधील निवासी डॉक्टरांचा सामूहिक रजेचा निर्णय कायम राहिला. इंडियन मेडिकल असोसिएशनने निवासी डॉक्टरांना दिलेल्या पाठिंब्यामुळे शहरातील वैद्यकीय सेवा बंद राहिल्याने रुग्णांची गैरसोय झाली. डॉक्टरांनी बंदमध्ये सहभागी होत असताना अत्यावश्यक सेवा मात्र सुरू राहिल्या. अनेक खासगी रुग्णालयांमध्ये काळ्या फिती लावून काम करण्यात आले.ससूनमधील निवासी डॉक्टरांनी सामूहिक रजेवर जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर प्रशासनातर्फे त्यांच्यावर निलंबनाच्या कारवाईचा बडगा उगारण्यात आला. त्यानंतरही डॉक्टरांनी संपाचा निर्णय रात्री उशिरापर्यंत कायम ठेवला होता. शासनस्तरावरून सुरक्षाव्यवस्था वाढविण्यासह अलार्म यंत्रणा, पास सिस्टीम असे विविध आदेश गिरीश महाजन यांनी दिल्यानंतरही त्या आश्वासनांची पूर्तता होत नसल्याने, रजा सुरूच ठेवणार असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले. दरम्यान, डॉक्टरांच्या काम बंदच्या निर्णयामुळे रुग्णांचे अतोनात हाल झाले. अनेक रुग्णालयांमध्ये उपचारांसाठी लांबच लांब रांगा लागल्या होत्या. शहरातील अनेक सरकारी रुग्णालयांमध्ये उपचार मिळत नसल्याने रुग्णांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या. बाहेरगावाहून आलेल्या रुग्णांचे जास्त हाल झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. अनेक रुग्णालयांमध्ये केवळ ओपीडी बंद ठेवण्यात आले होते, तर काही रुग्णालयांमध्ये केवळ तातडीच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या. मोजक्या लोकांच्या चुकीमुळे डॉक्टर सर्वच निर्दोष सामान्य रुग्णांना वेठीस धरत असल्याची प्रतिक्रिया या वेळी व्यक्त करण्यात आली.(प्रतिनिधी)