शहरं
Join us  
Trending Stories
1
अंबाबाईच्या चरणी १ कोटी ८४ लाखांचे दान; कोल्हापुरच्या देवस्थान समितीकडून मोजणी
2
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
3
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
4
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
5
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
6
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
7
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
8
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
9
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
10
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
11
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
12
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
13
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
14
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
15
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
16
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
17
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
18
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
19
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव
20
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण

अर्धवट काँक्रीट रस्त्यामुळे गैरसोय

By admin | Published: October 12, 2016 2:51 AM

राजाराम पूल ते म्हात्रे पुलादरम्यानच्या डीपी रस्त्यावर कांक्रिटीकरणाचे काम अर्धवट अवस्थेत थांबले असल्याने दीर्घ काळापासून काही भागात रस्ता अरुंद

पुणे : राजाराम पूल ते म्हात्रे पुलादरम्यानच्या डीपी रस्त्यावर कांक्रिटीकरणाचे काम अर्धवट अवस्थेत थांबले असल्याने दीर्घ काळापासून काही भागात रस्ता अरुंद बनला असून, तो धोकादायक झाला आहे. या डीपी रस्त्याला श्रीकांत मंत्री असे नाव देण्यात आले आहे. राजाराम पुलाकडील भागापासून या रस्त्याच्या काँक्रिटीकरणाला सुरुवात झाली होती. मात्र, रस्ता योग्य प्रमाणात खोदाई न करता वरच्या स्तरात काँक्रीट पसरून हे काम केले जात होते. त्यातच स्थानिक नागरिकांनी रस्त्याची उंची वाढल्याने पावसाचे पाणी सोसायट्यांमध्ये व घरांमध्ये घुसण्याची शक्यता असल्याने विरोध दर्शविला होता.अखेर रस्त्याच्या डाव्या बाजूचे काँक्रिटीकरण काही मीटर पूर्ण झाल्यानंतर हे काम अर्धवट सोडण्यात आले. त्यामुळे रस्त्याचा काही भाग फूट ते दीड फूट उंच होऊन मूळचा डांबरी रस्ता अरुंद झाला. या परिसरात वाहतुकीचे प्रमाण वाढले आहे. गेले अनेक महिने या रस्त्यावरून सकाळी व सायंकाळी गर्दीच्या वेळी काहीशी कोंडी होत आहे. महापालिका व वाहतूक विभागाने या कांक्रिटीकरण झालेल्या परिसरात वाहनांचा वेग ताशी ठेवण्याचे फलक लावून तात्पुरती मलमपट्टी केली आहे. स्थानिक नगरसेवक व आमदार मेधा कुलकर्णी यांना या रखडलेल्या कामाबाबत विचारणा केली असता त्या म्हणाल्या, ‘‘काँक्रिटीकरण का बंद केले आहे, याबाबत मी पालिकेच्या रस्ते विभागाला व आयुक्तांना पत्रे लिहिली आहेत; मात्र त्याचे उत्तर मला मिळालेले नाही. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून व तांत्रिक बाबी तपासून हे काम सुरू झाले आहे काय, अशी विचारणा मी पत्रात केली आहे.’’दरम्यान, अर्धवट काँक्रीट झालेल्या भागाचा हॉटेलचालक पार्किंग म्हणून वापर करीत असून रखडलेल्या कामामुळे आयती सुविधा झाल्याने सायंकाळनंतर या रस्त्यावर अरुंद बाजूने वाहतूक, दुसरीकडे उंचावर चारचाकी वाहनांचे अनधिकृत पार्किंग, असे दृश्य दिसते.