पुरंदरचे आमदार संजय जगताप यांच्या निर्देशानुसार आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या सूचनेनुसार पुरंदर तालुक्याची संजय गांधी निराधार अनुदान योजना समिती गठित करण्यात आली असून या समितीची पहिलीच बैठक सासवड येथील तहसील कार्यालयात पार पडली. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी तहसीलदार रुपाली सरनोबत, गटविकास अधिकारी अमर माने, यांच्यासह अशासकीय सदस्य डॉ. राजेश दळवी, वैशाली निगडे, नीलम होले, कल्पना कावडे, शांताराम बोऱ्हाडे, संभाजी महामुनी, उज्वला पोमण, विजय साळुंखे, राजेश चव्हाण, या विभागाच्या ममता दुरटकर आदी उपस्थित होते.
तहसीलदार रुपाली सरनोबत यांनी नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार करून कामकाजाविषयी माहिती दिली. आतापर्यंत दाखल झालेली जवळपास पाच हजार प्रकरणे मंजूर झाली असून या सर्वाना विविध योजनांचा लाभ दिला जात आहे. त्याच प्रमाणे मंजूर प्रकरणे लवकरच मार्गी लावली जातील असेही त्यांनी सांगितले.
या प्रसंगी डॉ. राजेश दळवी, शांताराम बोऱ्हाडे, राजेश चव्हाण, उज्वला पोमण आदि सदस्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. आभार संभाजी महामुनी यांनी मानले.
२८ सासवड
संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीच्या सदस्यांच्या सत्कारप्रसंगी रुपाली सरनोबत, सुनिता कोलते, अमर माने व इतर.
===Photopath===
280521\28pun_15_28052021_6.jpg
===Caption===
२८ सासवड संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीच्या सदस्यांच्या सत्कारप्रसंगी रुपाली सरनोबत, सुनिता कोलते, अमर माने व इतर.