शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
3
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
4
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
5
Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
6
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
7
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
8
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
9
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
10
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
11
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
12
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
13
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
14
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
16
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
17
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
18
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
19
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
20
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'

असुरक्षित ऊसवाहतुकीकडे डोळेझाक

By admin | Published: February 28, 2015 2:20 AM

ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर, ट्रक जात असल्यास प्रमाणाहून अधिक भरलेला ऊस कधीही ढासळणे, तोल गेल्याने संपूर्ण ट्रॅक्टर पलटी होण्याचे प्रकार सध्या

अंकुश जगताप, पिंपरीऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर, ट्रक जात असल्यास प्रमाणाहून अधिक भरलेला ऊस कधीही ढासळणे, तोल गेल्याने संपूर्ण ट्रॅक्टर पलटी होण्याचे प्रकार सध्या वाढले आहेत. परिणामी ट्रॅक्टर, ट्रकपासून इतरांना जीव मुठीत घेऊनच मार्ग काढण्याची वेळ येत आहे. वाहतूक नियम धाब्यावर बसवून चालकांकडून बेदरकारपणे ऊसवाहतूक केली जात आहे. याकडे वाहतूूक पोलिसांचे दुर्लक्ष होत असून, उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडूनही याबाबत ठोस उपाययोजना होत नसल्याचे उघड झाले आहे. मोठी दुर्घटना झाल्यावरच जाग येणार का, असा प्रश्न चालकांमधून उपस्थित होत आहे. परिसरामध्ये श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्यासह लगतच्या इतर साखर कारखान्यांसाठी कार्यक्षेत्रातील मावळ, मुळशी, हवेली, खेड, आंबेगाव, जुन्नर आदी तालुक्यांमधील शेतकऱ्यांच्या उसाचा पुरवठा केला जातो. हा ऊस नेताना संबंधित वाहनचालकांकडून वाहतूक नियमांचे सर्रास उल्लंघन होत आहे. मोटार व्हेईकल अ‍ॅक्टनुसार ट्रॅक्टर ते ट्रॉलीची लांबी १८ मीटर ठेवणे बंधनकारक असताना दोन ट्रॉली जोडण्याचा धोका पत्करला जात आहे. ट्रॉली व ट्रकमध्ये क्षमतेपेक्षा जादा ऊस लादला जात आहे. त्यामुळे अ‍ॅक्सल, पाटे तुटणे, चाक निखळण्याचे प्रकार होतात. ऊस बाहेर पडू नये यासाठी ट्रॉलीला बाजूने जोडावयाच्या लोखंडी डांबांचा अभाव दिसतो. तात्पुरते लाकडी खांब लावून ऊस रचला जात आहे. त्यामुळे हादरे बसून ढिला झालेला ऊस बहुधा रस्त्यावर ढासळतो. अनेकदा ऊस एका बाजूला कलल्यामुळे (विशेषत: चढणीच्या, खड्डेमय रस्त्यांवर) ट्रॅक्टर पलटी होण्याचे प्रकार वाढत आहे. त्यातच ट्रॅक्टरला एकामागे एक जोडलेल्या ट्रॉलीला मागील बाजूस इंडिकेटर नसतात. एखाद्या वळणावर, महामार्गावर ट्रॅक्टर अचानक वळविला जातो. अशा वेळी काहीच न कळल्याने मागून येणाऱ्यांना अपघाताचा धोका नित्याचा झाला आहे. याकडे वाहतूक पोलीस, तसेच परिवहन प्रशासनाने आजवर गांभीर्याने पाहिले नसल्याचे स्पष्ट झाले आहे. परिणामी ही वाहने रस्त्यावरून धोक्याची घंटा वाजवीत बिनदिक्कत धावत आहेत. अशा वाहनचालकांसाठी खास प्रशिक्षण देणे, वेळोवेळी मार्गदर्शनपर व्याख्यानांच्या आयोजनाबरोबरच प्रसंगी दंडात्मक कारवाई करणे गरजेचे आहे. देशभरातील रस्तेवाहतूक सुरक्षा मोहीम यशस्वी ठरण्यासाठी शेतकऱ्यांचे नुकसानही होणार नाही असा सुवर्णमध्य साधत मार्ग काढण्याची गरज व्यक्त होत आहे.