पुण्याच्या पोटनिवडणुकीवरून काँग्रेस-राष्ट्रवादीत विसंवाद, मतभेद चव्हाट्यावर 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2023 09:54 AM2023-05-28T09:54:09+5:302023-05-28T09:55:01+5:30

जागा काँग्रेसची, दावा केला राष्ट्रवादी काँग्रेसने

Disagreement between Congress and ncp over Pune by elections differences on the surface ajit pawar bjp girish bapat | पुण्याच्या पोटनिवडणुकीवरून काँग्रेस-राष्ट्रवादीत विसंवाद, मतभेद चव्हाट्यावर 

पुण्याच्या पोटनिवडणुकीवरून काँग्रेस-राष्ट्रवादीत विसंवाद, मतभेद चव्हाट्यावर 

googlenewsNext

पुणे : खासदार गिरीश बापट यांच्या निधानामुळे रिक्त झालेल्या जागेवर आता खुद्द अजित पवार यांनीच दावा केला आहे. आघाडीच्या जागा वाटपात ही जागा काँग्रेसकडे असूनही पवार यांनी त्यावर राष्ट्रवादीचा दावा केला आहे. तर, दुसरीकडे कोणत्याही परिस्थितीत ही जागा सोडणार नसल्याचे काँग्रेसकडून सांगण्यात आले. यामुळे पोटनिवडणूक जाहीर होण्याआधीच महाविकास आघाडीतील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत.

टिंबर मार्केट येथे गुरुवारी घडलेल्या आगीच्या दुर्घटनेतील नुकसानीची पाहणी करण्यासाठी अजित पवार सकाळीच पुण्यात आले होते. त्यानंतर पत्रकारांबरोबर बोलताना त्यांनी पोटनिवडणूक जाहीर होणार असल्याची माहिती असल्याचे सांगितले.  ते म्हणाले, आता लोकसभेची मुदत संपण्यात फक्त वर्षाचा कालावधी बाकी असल्याने पोटनिवडणूक घेणार नाहीत, असे वाटत होते, मात्र पोटनिवडणूक लवकरच जाहीर होणार असे दिसते.

सध्याची राजकीय स्थिती अशी आहे की, प्रत्येक पोटनिवडणूक किंवा निवडणूक विरोधकांनी जिंकायला हवी. पुणे शहरात आमची राजकीय ताकद जास्त आहे.  आमचे ४० पेक्षा जास्त नगरसेवक होते, तर काँग्रेसचे फक्त १०. अशा स्थितीत ही जागा हातची का घालवायची? असा विचार आहे. त्यामुळे ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसने लढवावी असे आमचे म्हणणे असल्याचे पवार यांनी सांगितले. जिथे ज्यांची ताकद जास्त ती जागा त्यांनी लढवावी, असे साधे सूत्र आहे असेही ते म्हणाले.

पोटनिवडणुकीची तयारी पूर्ण
जिल्हा प्रशासनाच्या निवडणूक शाखेने पोटनिवडणुकीची सर्व प्रशासकीय तयारी पूर्ण केली आहे. मतदान यंत्रांपासून सर्व सज्जता प्रशासनाची आहे. मतदार याद्या अद्ययावत करणे, मतदान केंद्रांची निश्चिती, मतदान यंत्रांची तपासणी अशी सर्व कामे झाली असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.  

राजकीय ताकद कोणाची जास्त हे कसबा विधानसभेच्या पोटनिवडणुकीत दिसून आले आहे. अजित पवार काय म्हणाले? ते माहिती नाही, मात्र पुणे शहर लोकसभेच्या जागेवर आम्ही कोणाचाच दावा मान्य करणार नाही. ही जागा काँग्रेसचीच व पोटनिवडणूक जाहीर झाल्यानंतर ती काँग्रेसच लढवेल. यातून मविआत पुण्यामध्ये काहीही मतभेद वगैरे  होणार नाहीत.    
मोहन जोशी, प्रदेश उपाध्यक्ष, काँग्रेस.

Web Title: Disagreement between Congress and ncp over Pune by elections differences on the surface ajit pawar bjp girish bapat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.