जुन्नर पंचायत समितीकडे दिव्यांग बांधवांनी सुविधा मिळविण्यासाठी अर्ज करूनही अनेक दिव्यांगांना लाभ मिळत नाही. त्यामुळे एकूणच पंचायत समितीकडून दिव्यांगाची एक प्रकारे हेटाळणी होत असल्याचे स्पष्ट आहे.
या प्रकरणावरून दिव्यांग नाराज असून या सर्व सुविधा मिळविण्यासाठी दि. १५ फेब्रुवारी रोजी सर्व दिव्यांग पंचायत समितीमध्ये गटविकास अधिकारी एस. वाय. माळी व तहसीलदार हणमंत कोळेकर यांना भेटून निवेदन दिले असल्याची माहिती प्रहार दिव्यांग संघटनेचे तालुकाध्यक्ष विलास सोनवणे, मंगलताई गांजवे व महिंद्र फापाळे यांनी दिली. या वेळी राष्ट्रवादी अपंग सेलच्या जिल्हाध्यक्षा पुष्पाताई गोसावी, निरगुडेचे सरपंच दिलीप शिंदे, तालुकाध्यक्ष गोविंद ढमाले आदी उपस्थित होते.
या वेळी जुन्नर पंचायत समिती कार्यालयातील समाजकल्याण विभागात दुर्धर आजाराला मदत मिळावी म्हणून अनेक दिव्यांगांनी अर्ज केले आहे, पण त्यावर कार्यवाही होत नाही. कोविडच्या कालावधीत चार महिने प्रत्येक दिव्यांगाला एक हजार रूपये मिळणार होते. ते जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सांगितले होते ते मिळाले नाही. --
--
पाच टक्के निधी खर्च होत नाही
--
ग्रामपंचायतींनी त्यांच्या एकूण उत्पन्नापैकी पाच टक्के निधी दिव्यांगांच्या कल्याण योजनेवर खर्च करावे असा नियम आहे. मात्र या आळेफाटा ग्रामपंचायतमध्ये किती निधी सर्व मार्गाने जमा झाला हे समजत नाही. त्यासाठी सर्व ग्रामपंचायतींनी दरवर्षी जमा होणारा निधी व खर्च होणारा निधी नागरिकांना कळण्यासाठी पतसंस्थेप्रमाणे जमाखर्चाचे पुस्तक छापण्याचे लेखी आदेश गटविकास अधिकाऱ्यांनी सर्व ग्रामपंचायत ग्रामसेवकांना द्यावेत, अंत्योदय योजने अंतर्गत दिव्यांना रेशन मिळावे, रेशन देताना आधारकार्डच्या ठशाची समस्या निर्माण झाल्यास दिव्यांगाना सवलत देण्याचे आदेश तहसीलदार साहेबांनी पुरवठा विभागाला दयावेत, संजय गांधी निराधार योजनेची माहिती दिव्यांग संघटनेला कळविण्यात यावी, या व इतर मागण्यांचे निवेदन या वेळी देण्यात आले.
--
फोटो क्रमांक छ १६ आळेफाटा दिव्यांग निवेदन
फोटो - जुन्नर तालुक्यातील दिव्यांग बांधव पंचायत समिती व तहसीलदार यांना निवेदन देताना.